शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोकणकन्या, मांडवी एक्सप्रेसला पावसाळ्यात नवा साजश्रुंगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 11:48 IST

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेस गाड्यांचे रुपडे पावसाळ्यात बदलणार आहे. निळ्या रंगाऐवजी लाल व करड्या रंगाचा साज श्रुंगार करून या दोन्ही गाड्या १० जून ते ३१ आॅगस्ट २०१९ दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहेत.

ठळक मुद्देकोकणकन्या, मांडवी एक्सप्रेसला पावसाळ्यात नवा साजश्रुंगार दोन्ही एक्सप्रेस गाड्यांचे रुप बदलणार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेस गाड्यांचे रुपडे पावसाळ्यात बदलणार आहे. निळ्या रंगाऐवजी लाल व करड्या रंगाचा साज श्रुंगार करून या दोन्ही गाड्या १० जून ते ३१ आॅगस्ट २०१९ दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यात निसर्गाने हिरवा शालू नेसलेला असताना त्यामधून या लाल व करड्या रंगाच्या साजश्रुंगारातील गाड्याचे रुप अधिकच खुलणार आहे.कोकण रेल्वेने या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांचे रुप पावसाळ्यात बदलण्याचे ठरविले आहे. आधीच्या निळ्या रंगातील इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नाईच्या या गाड्यांच्या बोगीऐवजी आता प्रवासी क्षमता अधिक असलेल्या व लाल-करड्या रंगातील लिके होल्फमन बूश बोगी जोडल्या जाणार आहेत. या गाड्यांमध्ये अत्याधुनिक प्रसाधनगृहे, आरामदायी बैठक व्यवस्था असेल.एलएचबी डब्यांच्या शयनयान बोगींमध्ये ७२ ऐवजी ८० प्रवासी झोपू शकणार आहेत. एसी थ्री टायर श्रेणीतील बी १ ते बी ५ या बोगींमधील प्रवासी क्षमताही ६४ ऐवजी ७२ होणार आहे. एसी २ टायरमध्ये ५४ व एचए १ मध्ये २४ प्रवासी क्षमता असेल. त्यामुळे कोकणकन्यामध्ये १२४ तर मांडवी एक्सप्रेसमध्ये ९४ प्रवासी क्षमता वाढणार आहे.एलएचबी बोगी या अ‍ॅण्टी टेलिस्कोपिक पध्दतीच्या असून अपघातात या बोगी उलटणार नाहीत. स्टील बॉडी असल्याने अपघाताच्यावेळी डबा फाटलाच तर पत्रा आत न वळता बाहेरच्या बाजुला वळेल व प्रवाशांना इजा होणार नाही.

कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक १० जूनपासून सुरू होणार आहे. त्याच दिवसांपासून या नवीन रुपातील दोन्ही गाड्या सुरू होणार असून ३० आॅगस्टपर्यंत त्या प्रायोगिक असतील तर नंतर त्या नियमित होतील.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी