शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
5
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
6
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
7
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
8
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
9
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
10
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
11
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
12
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
13
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
14
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
15
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
16
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
17
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
18
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
19
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
20
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना

कोकण रेल्वे : आश्वासने हवेत विरली...

By admin | Updated: October 7, 2014 23:49 IST

प्रकल्पग्रस्त अद्याप वाऱ्यावरच, अनेक प्रश्न अजून जैसे थे!

एजाज पटेल - फुणगूस -कोकण रेल्वे आली आणि स्वप्न साकार झाले, हे वाक्य केवळ फलकावर लिहिण्यासाठीच शोभादायक असून, आजही अनेक प्रकल्पग्रस्त कोकण रेल्वेत नोकरी मिळवण्यापासून वंचितच आहेत. कष्टकरी, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून रेल्वे धावत असली तरी याचा प्रत्यक्ष लाभ कोकणपेक्षा अन्य राज्यानाच अधिक होत आहे. कोकणवासीयांना संघर्ष केल्याशिवाय कोकण रेल्वेने काहीच दिले नाही. कोकण रेल्वेकडून होणारे सर्व प्रकारचे प्रदूषण थांबवण्यासाठी तातडीची उपाययोजना हाती घेण्याची मागणी करण्यात येत आहे.लांब पल्ल्याच्या गाड्या न थांबणे, स्थानिक कष्टकरी प्रवाशांना अपमानास्पद वागणूक मिळणे, रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स संगनमत करुन परप्रांतीयांना देणे, आवश्यक असताना जादा गाड्या न सोडणे, रेल्वे स्थानकावरील गैरसोयी दूर न करणे, यासह अनेक कारणांमुळे कोकणवासीयांना कोकण रेल्वे प्रशासनाचा खरा चेहरा दिसून आला. मात्र, संघटित होऊन कोकण रेल्वे प्रशासनाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी योग्य दिशा न मिळाल्यामुळे कोकणवासीयांच्या मनातील उद्रेक उग्ररुप धारण करु शकला, असे मत व्यक्त होताना दिसत आहे.कोकण रेल्वे मार्ग ज्या गावांमधून गेला आहे, त्या सर्वच गावांमधून ग्राम स्वच्छता अभियान आणि निर्मल ग्राम योजनेचा बोजवारा उडाला आहे. रेल्वेतून बाहेर रुळावर पडणारा मैला आणि सर्व प्रकारचा कचरा ही मोठी समस्या बनली आहे. यामुळे कोकणात सर्वाधिक प्रदूषण हे त्यामुळे होत असल्याचे एका पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये दोन स्वच्छतागृह असतात. प्रत्येक डब्यातून किमान १५० प्रवासी सफर करतात. प्रवाशांना स्वच्छतागृहाचा वापर हा अनिवार्यच आहे. मात्र, रेल्वेत प्रवाशांसाठी असणारे स्वच्छतागृह रेल्वेमार्ग ज्या गावातून गेला आहे, त्यांच्यासाठी अस्वच्छता पसरवत आहे. स्वच्छतागृहातील मलमुत्रांच्या विसर्जनासाठी वेगळी सोय नसल्याने हा मैला रेल्वे रुळांवर सर्वाधिक प्रदूषण करत आहे.चहा देण्यासाठी असणारी कुल्हडची योजना बारगळल्यानंतर आता सर्रास प्लास्टिकचे कप वापरले जात आहेत. हे प्लास्टिक कप रेल्वे रुळावर सर्वाधिक प्रदूषण करणारे ठरत आहेत. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर जेवणाच्या प्लेट्स तसेच प्लास्टिकचे कप सर्व गाड्यांतून जातात.कोकणातील गाव निर्मल ग्राम होण्यामध्ये रुळावरुन फिरणाऱ्या रेल्वेचा अडसर हे असल्याने प्रदूषण मंडळ, पर्यावरण विभाग आदींनी कोकण रेल्वेला प्रदूषण रोखण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी कोकणातील बहुतांश ग्रामपंचायतींनी केली आहे. कोकण रेल्वेविरुद्धच्या प्रदूषण रोखण्याच्या लढ्यात केवळ कोकण रेल्वे मार्ग ज्या ग्रामपंचायत हद्दीतून गेला आहे, त्या ग्रामपंचायतींचाच समावेश नसून, सर्वच ग्रामपंचायती या लढ्याला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे केले तरच या लढ्याला यश येईल.