शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बारावी निकालात कोकण आठव्यादा अव्वल, कोकण मंडळाचा ९३.२३ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 16:31 IST

बारावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने स्थापनेपासून राज्यात अव्वल स्थान मिळविले असून, गतवर्षीच्या तुलनेत १.६२ टक्क्यांनी निकाल कमी लागला असल्याची माहिती मंडळाच्या विभागीय सहसचिव भावना राजनोर यांनी दिली. यावेळी माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी देविदास कुल्लाळ उपस्थित होते.

ठळक मुद्देबारावी निकालात कोकण आठव्यादा अव्वल, कोकण मंडळाचा ९३.२३ टक्के निकालसिंधुदुर्ग जिल्ह्याचा झेंडा, ९ मंडळांमध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण निकाल ९३.२३ टक्के इतका लागला आहे. बारावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने स्थापनेपासून राज्यात अव्वल स्थान मिळविले असून, गतवर्षीच्या तुलनेत १.६२ टक्क्यांनी निकाल कमी लागला असल्याची माहिती मंडळाच्या विभागीय सहसचिव भावना राजनोर यांनी दिली. यावेळी माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी देविदास कुल्लाळ उपस्थित होते.राज्यातील एकूण ९ मंडळांमध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ पुणे विभागाचा ८७.८८ टक्के, तर अमरावती विभागाचा ८७.५५ टक्के इतका निकाल लागला आहे. पुणे व अमरावती विभागांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सर्वाधिक कमी निकाल नागपूर विभागाचा असून ८२.५१ टक्के इतका लागला आहे.रत्नागिरी - सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यातून ३१ हजार ७७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी २९ हजार ६१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून १६ हजार ५२३ मुलगे परीक्षेस बसले होते, पैकी १४ हजार ९१२ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.२५ टक्के इतके आहे, तर मंडळातून १५ हजार २४१ मुली परीक्षेस बसल्या होत्या. पैकी १४ हजार ७०० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.४५ टक्के आहे. संपूर्ण निकालात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून, मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ६.२ने अधिक आहे. गतवर्षी मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ४.४४ टक्के होती. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्णतेची टक्केवारी यावर्षी पुन्हा वाढली आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालRatnagiriरत्नागिरी