शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
3
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
4
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
5
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
6
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
7
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
8
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
9
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
10
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
11
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
12
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
14
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
15
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
16
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
17
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
18
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
19
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
20
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...

कोकण कृषी विद्यापीठाचा कृषी परिषदेच्या केंद्रांसोबत सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 16:39 IST

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या तीन नामांकित संशोधन केंद्रांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोकण कृषी विद्यापीठाचा कृषी अनुसंधान परिषदेच्या संशोधन केंद्रांसोबत सामंजस्य करारविभाग प्रमुख, प्राध्यापक यांचे उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या तीन नामांकित संशोधन केंद्रांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी - पुणे, पुष्पविज्ञान अनुसंधान निर्देशनालय, पुणे आणि राष्ट्रीय अजैविक ताण संस्था, बारामती या भारतातील तीन नामांकित संशोधन संस्था आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत यांचे अध्यक्षतेखाली सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी - पुणे संस्थेच्या संचालिका डॉ. इंदू सावंत, पुष्पविज्ञान अनुसंधान निर्देशनालय, पुणे संस्थेचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद आणि राष्ट्रीय अजैविक ताण संस्था, बारामती संस्थेचे संचालक डॉ. जगदीश राणे उपस्थित होते.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे डॉ. सतीश नारखेडे, शिक्षण संचालक यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख आणि प्राध्यापक यांचे उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी - पुणे, पुष्पविज्ञान अनुसंधान निदेशनालय, पुणे आणि राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती या तीनही संशोधन केंद्रांमध्ये उत्कृष्ट संशोधन सुविधा उपलब्ध असल्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळूण भविष्यामध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याचे मत कुलगरु डॉ. संजय सावंत यांनी व्यक्त केले.

टॅग्स :dapoli-acदापोलीagricultureशेतीRatnagiriरत्नागिरी