शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोलेखाजन चव्हाणवाडी ग्रामपंचायतीने बांध केला जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 18:40 IST

न्यायालयात दाद मागणार : प्रताप चव्हाण

आॅनलाईन लोकमतचिपळूण (जि. रत्नागिरी), दि. २४ : कोलेखाजन-चव्हाणवाडी येथील जांभ्या दगडाचा बांध ग्रामपंचायतीने अनधिकृत ठरवून भर पावसात तोडल्यामुळे आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे जागामालक प्रताप चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण यांनी आपल्या चुलत्यांकडून १९८६मध्ये २३ गुंठे जागा विकत घेतली. तेथे त्यांनी घर बांधले. आपल्या कुटुंबासह याठिकाणी राहताना आपल्या घराच्या बाजूला जांभ्याचा पक्का कठडा बांधला. तसेच आपल्या घराच्या डाव्या बाजूला ३ फुटाची पायवाट त्यांनी शेतकरी व जनावरांसाठी ठेवली होती. या वाटेच्या बाजूने जांभ्याचा बांध त्यांनी घातला. मात्र, दि. २८ मार्च रोजी काही स्थानिक ग्रामस्थांनी या बांधाला हरकत घेतली. त्यानंतर दि. २९ मार्च रोजी तंटामुक्त समितीत याबाबत चर्चा झाली. मात्र, तेथील तोडगा मान्य न झाल्याने आपण पोलिसात तक्रार केली. त्यानंतर तत्कालिन पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्यासमोर हरकत घेणारे ग्रामस्थ व आपली बैठक झाली. यावेळी आपण ३ फूट व लगतच्या जागामालकाने ३ फूट जमीन सोडावी, असे ठरले होते. यानंतर हरकत घेणाऱ्या ग्रामस्थांनी थेट तहसीलदारांकडे तक्रार केली. यावर चिपळूणचे तहसीलदार जीवन देसाई यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आमचे जाबजबाब घेतले व दि. ३ जुलै रोजी आपल्याला नोटीस बजावली. मात्र, ही नोटीस आपल्याला दि. १२ जुलै रोजी मिळाली. त्यानंतर तहसीलदारांच्या निकालाचे कागदपत्र मिळावेत यासाठी आपण अर्ज केला. मात्र, कागदपत्र मिळण्याअगोदरच दि. १८ जुलै रोजी मिरजोळी ग्रामपंचायतीने तहसीलदारांच्या आदेशानुसार आपले पक्के कंपाऊंड जेसीबीच्या सहाय्याने भर पावसात जमीनदोस्त केले. ग्रामपंचायतीची ही कारवाई सुरु असताना ग्रामसेवक मंगेश पिंगळे तेथे होते. आपण त्यांनाही याबाबत विचारले. तहसीलदारांच्या आदेशाने आपण बांधकाम तोडत आहोत, असे ग्रामसेवकांनी सांगितले. मात्र, याची कोणतीही लेखी आॅर्डर त्यांच्याकडे नव्हती. आपल्या खासगी जागेतून ३ फूट पायवाट स्वखुशीने विनामोबदला सोडली असतानाही ग्रामपंचायतीने ती अनधिकृत ठरवून आपले बांधकाम तोडल्याचे त्यांनी सांगितले.