शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
4
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
5
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
6
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
7
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
8
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
9
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
10
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
11
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
12
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
13
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
14
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
15
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
16
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
17
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
18
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
19
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
20
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती

चिपळुणातील अतिक्रमण रोखण्यासाठी ठोकले पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 17:56 IST

chiplun, nagarpalika, muncipaltycarporation, ratnagirinews शहरात पुन्हा-पुन्हा होणाऱ्या अतिक्रमणांवर चिपळूण नगर परिषदेने आता जालीम उपाय शोधला आहे. शहरात रस्त्याच्या कडेला थेट पत्रे मारून अतिक्रमण करण्याला पायबंद घातला जात आहे. त्यामुळे रस्ते मोकळे झाले असून, फेरीवाल्यांना पत्रा हद्दीच्या आतमध्ये व्यापार करण्यास मुभा देण्यात आली आहे. या युक्तीमुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्याही काही प्रमाणात सुटणार आहे.

ठळक मुद्देचिपळुणातील अतिक्रमण रोखण्यासाठी ठोकले पत्रेनगर परिषदेने शोधला अतिक्रमणांवर जालीम उपाय

अडरे : शहरात पुन्हा-पुन्हा होणाऱ्या अतिक्रमणांवर चिपळूण नगर परिषदेने आता जालीम उपाय शोधला आहे. शहरात रस्त्याच्या कडेला थेट पत्रे मारून अतिक्रमण करण्याला पायबंद घातला जात आहे. त्यामुळे रस्ते मोकळे झाले असून, फेरीवाल्यांना पत्रा हद्दीच्या आतमध्ये व्यापार करण्यास मुभा देण्यात आली आहे. या युक्तीमुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्याही काही प्रमाणात सुटणार आहे.शहरातील वाढते अतिक्रमण पाहता चिपळूण नगर परिषदेने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम युद्धपातळीवर राबवून खोके, हातगाड्या, शेड आणि काही बांधकामे जमीनदोस्त केली. याला व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतरही नगर परिषद प्रशासनाने आपली ही मोहीम सुरूच ठेवली. काही दिवसांनी शहरातील भोगाळे ते बसस्थानक परिसरात पुन्हा अतिक्रमण झाले.

याठिकाणी अनधिकृत खोके आणि हातगाड्या पुन्हा उभ्या राहिल्या. त्यामुळे रस्त्याच्या कडेला आवश्यक तेवढी जागा सोडून थेट पत्रे ठोकून अतिक्रमणाला पायबंद घालण्याची मोहीम शनिवारी हाती घेण्यात आली. अतिक्रमण हटाव पथकाचे संदेश टोपरे, विनायक सावंत यांच्या उपस्थितीत पालिका कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला पत्रे ठोकून जागा आरक्षित करण्यास सुरुवात केली.यावेळी सुरुवातीला व्यापाऱ्यांचा काहीसा विरोध झाला. परंतु, ही व्यवस्था व्यावसायिकांच्याही सोयीची असल्याचे टोपरे यांनी पटवून दिल्यानंतर विरोध मावळला. पत्रा हद्दीच्या आतमध्ये व्यावसायिकांना व्यापार करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्याबाहेर कोणालाही व्यापार करता येणार नाही. तसे आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहितीही टोपरे यांनी दिली.चिपळूण नगर परिषदेने हाती घेतलेल्या या मोहिमेचा सर्वांनाच फायदा होणार आहे. यामुळे शहरातील मुख्य रस्ता मोकळा राहणार असून, वाहतुकीची समस्याही काही प्रमाणात सुटणार आहे. तसेच फेरीवाले व व्यावसायिकांनाही याचा फायदा होणार असल्याने त्यांच्याकडून नगर परिषदेच्या या मोहिमेचे स्वागत केले जात आहे. भोगाळे ते बसस्थानक बुरुमतळी या मुख्य रस्त्याच्या कडेला पत्रे ठोकण्याची मोहीम शनिवारी दिवसभर कर्मचाऱ्यांकडून राबवली जात होती.

टॅग्स :Chiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदMuncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी