शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खेड नगराध्यक्षांचे दालन बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 15:53 IST

नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या दालनाच्या नूतनीकरणाच्या कामावरून सुरू झालेल्या वादाची कोंडी अखेर फुटली आहे. बांधकाम सभापती नम्रता वडके यांनी दालनाच्या नूतनीकरण व सुशोभिकरणावर घेतलेला आक्षेप जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी फेटाळून लावला. यामुळे नगरपरिषदेत सुरू असलेल्या केबिन नाट्यावर पडदा पडला आहे.

ठळक मुद्देखेड नगराध्यक्षांचे दालन बचावलेदालन वाद, शिवसेनेचा आक्षेप जिल्हाधिकारी यांनी फेटाळला

खेड : नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या दालनाच्या नूतनीकरणाच्या कामावरून सुरू झालेल्या वादाची कोंडी अखेर फुटली आहे. बांधकाम सभापती नम्रता वडके यांनी दालनाच्या नूतनीकरण व सुशोभिकरणावर घेतलेला आक्षेप जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी फेटाळून लावला. यामुळे नगरपरिषदेत सुरू असलेल्या केबिन नाट्यावर पडदा पडला आहे.नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना नगर परिषद अधिनियमातील कलम ५८ नुसार आकस्मिक खर्च करण्याचा पूर्ण अधिकार आहे. नगराध्यक्षांच्या ५८ खालील विशेष अधिकाराला ३०८ खाली आव्हान देता येणार नाही. स्थायी समितीचा ठराव असेल तर अशी कारवाई करता येते, असा युक्तिवाद वैभव खेडेकर यांच्यातर्फे अ‍ॅड. जी. एन. गवाणकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर केला.

नम्रता वडके यांनी स्वत: जिल्हाधिकारी यांच्यापुढे आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर जिल्हाधिकारी यांनी खेडेकर यांचा निर्णय योग्य असल्याचा निर्णय दिला. खेडेकर यांच्या नगरपालिकेतील दालनात पावसामुळे गळती होत होती. पाण्यामुळे भिंतीला शॉक येण्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे खेडेकर यांनी विशेषाधिकार वापरून दालनाच्या नूतनीकरण सुरू केले. त्याला नम्रता वडके यांनी आक्षेप घेतला.प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी तक्रारीवर झालेल्या सुनावणीचा निकाल राखून ठेवल्याने वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ सलग ८ दिवस मुख्य प्रवेशद्वाराजवळच बसून कामकाज केले होते. आता आक्षेप फेटाळला गेल्याने नव्या दालनाच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. या निर्णयामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. 

या निर्णयामुळे मी समाधानी असून, जिल्हाधिकारी यांच्या या आदेशाचे स्वागत करतो. बांधकाम सभापतींच्या वैयक्तिक द्वेषापोटी नगरपरिषद प्रशासन जवळपास एक महिना ठप्प झाले होते. मात्र, यापुढे शहरात विकासकामे सुरू होतील.- वैभव खेडेकर, नगराध्यक्ष

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरीKhedखेड