शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोटिस्मा’ संग्रहालयात तीनशे वर्षपूर्व अश्वारूढ खंडोबा मूर्ती

By संदीप बांद्रे | Updated: October 8, 2022 17:48 IST

सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची ही मूर्ती चिपळूणचे पहिले नगराध्यक्ष कै. रंगनाथ बापूजी पत्की यांच्या नित्यपूजेतील आहे.

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या संग्रहालयासाठी तीन किलो वजन आणि २६ सेंटीमीटर उंची असलेली अश्वारूढ खंडोबाची मूर्ती देण्यात आली आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची ही मूर्ती चिपळूणचे पहिले नगराध्यक्ष कै. रंगनाथ बापूजी पत्की यांच्या नित्यपूजेतील आहे. पत्की यांच्या घराण्यात वारस नसल्यामुळे नित्यपूजेतील ही मूर्ती मोहन चितळे यांच्याकडे दिली होती. चितळे यांनी या मूर्तीसह आणखी दोन पूजेतील मुद्रांकित मूर्ती (टाक) लोटिस्माच्या संग्रहालयाला भेट दिले.ब्रिटीशकाळात चिपळूण नगरपालिकेच्या शासन नियुक्त नगराध्यक्ष यांना ‘कार्यकारी अधिकारी’ म्हणत असत. पहिले अधिकारी म्हणून कै. रंगनाथ बापूजी पत्की यांची शासनाने निवड केली होती. १८७७ ते १९०७ असे सलग तीस वर्ष कै. पत्की या पदावर कार्यरत होते. शहरात आज उभे असलेले मच्छीमार्केट व मटणमार्केटची जागा पत्की यांची होती. नवा भैरी मंदिराची जागाही पत्की यांनीच दिली होती. शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय असलेल्या माधवबाग या ठिकाणी त्यांचा वाद होता. कालांतराने त्यांच्या वंशजांनी ही जागा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिली.लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराची आजची इमारत असलेली जागा कै. पत्की नगराध्यक्ष असताना वाचनालयाला कराराने देण्यात आली होती. दीडशे वर्षांपूर्वीचे हे करारपत्र वाचनालयात उपलब्ध आहे. मोहन चितळे यांनी ही अमूल्य मूर्ती भेट देऊन शहराचे माजी नगराध्यक्ष कै. पत्की यांची सदैव आठवण राहील यासाठी जे सहकार्य केले त्याबद्दल लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी