शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दापोली तालुक्यातील कवी केशवसुतांचे घर भग्नावस्थेत,  वळणे गावातील स्मृती कायम राहण्यासाठी प्रयत्न गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 11:46 IST

चातुवर्ण्य व्यवस्थेचा पगडा असणाऱ्या काळात  ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, ना मी एक पंथाचा, तेच पतित की, जे आखडती प्रदेश साकल्याचा, अशी वैचारिक क्रांतीची काव्यसुमने लिहिणऱ्या कृष्णाजी केशव दामले ऊर्फ कवी केशवसुत यांचे वळणे (ता. दापोली) येथील घर सध्या भग्नावस्थेत आहे. केशवसुतांना ज्याठिकाणी काव्यसंपदा स्फुरली, त्या वळणे गावात केशवसुतांची स्मृती कायम राहण्यासाठी या घराची दुरुस्ती करून त्याचे जतन करावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.

ठळक मुद्देवैचारिक क्रांतीची काव्यसुमने लिहिणाऱ्या कवी केशवसुत यांचे वळणे येथे घर निसर्गरम्य परिसराने केशवसुतांच्या मनातील काव्यप्रतिभा जागृत आधुनिक कवितेचे जनक म्हणून कवी केशवसुत यांची ओळख

दापोली : चातुवर्ण्य व्यवस्थेचा पगडा असणाऱ्या काळात  ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, ना मी एक पंथाचा, तेच पतित की, जे आखडती प्रदेश साकल्याचा, अशी वैचारिक क्रांतीची काव्यसुमने लिहिणऱ्या कृष्णाजी केशव दामले ऊर्फ कवी केशवसुत यांचे वळणे (ता. दापोली) येथील घर सध्या भग्नावस्थेत आहे. केशवसुतांना ज्याठिकाणी काव्यसंपदा स्फुरली, त्या वळणे गावात केशवसुतांची स्मृती कायम राहण्यासाठी या घराची दुरुस्ती करून त्याचे जतन करावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.विषय आणि अभिव्यक्ती या सर्वार्थाने आधुनिक कवितेचे जनक ठरलेल्या कवी केशवसुतांचे दापोली तालुक्यात दाभोळ मार्गावर वळणे हे गाव आहे. केशवसुतांच्या काव्यप्रतिभेची खरी सुरुवात याच वळणे गावातून झाली. केशवसुतांचे जन्मगाव हे रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड असले तरी दापोली येथील वळणे येथे काहीकाळ त्यांचे वास्तव्य होते.

निसर्गरम्य वळणे गावातून शांतपणे वाहणारी नदी, तेथील केवड्याचे बन, नारळी, पोफळी, आंबा, काजू आणि विविध प्रकारच्या झाडांनी नटलेल्या रम्य परिसराने केशवसुतांच्या मनातील काव्यप्रतिभा जागृत होऊन कवितांनी आकार घेतला. या काव्यांचा सुगंध सर्वदूर दरवळला. मात्र, केशवसुतांचे वास्तव्य असलेले वळणे गावातील हे घर सध्या भग्नावस्थेत असून, सद्यस्थितीत घराच्या पडलेल्या भिंती व घराच्या जोत्याचे अवशेषच फक्त शिल्लक राहिले आहेत.

वळणे येथील केशवसुतांच्या घराच्या दुरुस्तीबाबत कवी मधुमंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष असताना प्रयत्न केले होते. मात्र, त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आजच्या घडीला याठिकाणी फक्त आठवणीच शिल्लक राहिल्या आहेत.

दापोलीमध्ये येणाऱ्या साहित्यप्रेमी पर्यटकांना आद्यकवी केशवसुत यांचे वळणे गावातील घर पाहण्याची इच्छा असते. मात्र, दुर्दैवाने आज हे घर जमीनदोस्त झाल्यामुळे पर्यटकांची घोर निराशा होते. 

स्मृती जपणे गरजेचेमालगुंड या केशवसुतांच्या जन्मगावी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रयत्नाने कवी केशवसुतांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी आणि नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी एक वेगळेपण असलेले स्मारक उभारण्यात आले आहे. मराठी साहित्य अजरामर केलेल्या तुतारीकार केशवसुतांच्या स्मृती जपण्यासाठी वळणे (ता. दापोली) येथील भग्नावस्थेत असलेले केशवसुतांचे घर दुरुस्त करून स्मारक उभारल्यास साहित्यप्रेमी पर्यटकांना एक नवे दालन खुले होईल.- प्रशांत परांजपे,केंद्रीय कार्यवाह, कोमसाप.

टॅग्स :literatureसाहित्यRatnagiriरत्नागिरी