शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

कोमसाप युवा शक्तीचे तरंगते कवी संमेलन

By admin | Updated: November 16, 2014 23:33 IST

दापोलीनजीकच्या दाभोळ खाडीत १४ डिसेंबरपासून आयोजन

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषद युवा शक्तीतर्फे येत्या १४ डिसेंबर रोजी प्रथमच दापोली तालुक्यातील दाभोळ खाडी येथे तरंगते युवा काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ही माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, कार्याध्यक्ष नमिता कीर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.यावेळी कोषाध्यक्ष प्रकाश दळवी, रत्नागिरीच्या युवा शक्तीप्रमुख गौरी सावंत व पदाधिकारी उपस्थित होते. या संमेलनाबाबत माहिती देताना केळुसकर व कीर यांनी सांगितले की, कोकण मराठी साहित्य परिषद गेली २५ वर्षे कोकण प्रांतात विविध स्तरावर मराठी साहित्य विषयात कार्यरत आहे. पुढील वर्ष हे परिषदेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने वर्षभर विविध साहित्यिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. दाभोळ खाडीत होणारे हे युवा शक्तीचे तरंगते कवीसंमेलन रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित होत आहे. त्यामध्ये कोकण प्रांताच्या पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून युवा शक्ती अंतर्गत असलेल्या महाविद्यालय युवा कट्टाच्या माध्यमातून निवडक नवोदित कवी बहुसंख्येने उपस्थित रहाणार आहेत.या संमेलनासाठी १३ डिसेंबर १४ रोजी सर्व जिल्ह्यामधून युवा कट्ट्यामार्फत स्वरचित काव्य वाचन स्पर्धेद्वारे निवडलेले दोन कवी दापोली येथे एकत्र येतील. तेथील एका मंगल कार्यालयात त्यांचा निवास असेल. १४ डिसेंबर १४ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत इको फ्रेंडली परांजपे संग्रहालयाला भेट व नवरत्नांना मानवंदना, १० वाजता चिखलगावकडे प्रयाण, ११ ते १ कवीता कार्यशाळा संचलन डॉ. महेश केळुसकर व गौरी कुलकर्णी, २.३० ते ३.३० साहित्यिकांजवळ खुली चर्चा व प्रश्नोत्तर, ४ ते ५ लोकमान्य टिळकांच्या मुळ निवासस्थानाला भेट, ६ वाजता सुर्यास्तासमवेत दाभोळ खाडी येथे बोटीवर तरंगत्या कवी संमेलनाला सुरुवात. या तरंगत्या कवी संमेलनास कोमसापचे अध्यक्ष डॉ. केळुसकर, गौरी कुलकर्णी, रवींद्र आवटी, डॉ. सलील कुलकर्णी, संदीप खरे, सौमित्र अशा दिग्गज कवींची उपस्थिती लाभणार आहे. तर खुल्या चर्चेकरिता डॉ. सागर देशपांडे उपस्थित राहणार आहेत.(प्रतिनिधी)