शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

जगबुडी पुलावर महामार्ग दोन तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:28 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर मालवाहू ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने महामार्ग सुमारे दोन तास ठप्प झाला होता. वाहतूक व स्थानिक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने रस्त्यात बंद पडलेला मालवाहू ट्रक बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

ठळक मुद्देजगबुडी पुलावर महामार्ग दोन तास ठप्प रस्त्याच्या मधोमध अवजड मालवाहू ट्रक नादुरूस्त होऊन बंद

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर मालवाहू ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने महामार्ग सुमारे दोन तास ठप्प झाला होता. वाहतूक व स्थानिक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने रस्त्यात बंद पडलेला मालवाहू ट्रक बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.सध्या उन्हाळी सुटी आणि लग्नसराई असल्याने मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. उन्हाळी सुटीचा आनंद उपभोगण्यासाठी कोकणात तसेच कोकणमार्गे गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी असल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील रहदारी कमालीची वाढली आहे.महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याने अनेक ठिकाणी रहदारीचा वेग मंदावू लागला आहे. त्यातच आज दुपारी खेडनजीकच्या जगबुडी पुलावर एक अवजड मालवाहू ट्रक नादुरूस्त होऊन रस्त्याच्या मधोमध बंद पडला.चालकाने बंद पडलेला ट्रक सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या ट्रकमधील बिघाड दूर होऊ न शकल्याने मुंबई - गोवा महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला. मुंबईहून गावाला निघालेले अनेक चाकरमानी रस्त्यातच अडकून पडले.

काही वाहनचालकांनी भरणे नाका येथून व्हाया खेड शहरमार्गे चिपळूणकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरणे-खेड रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याने महामार्गही वाहतुकीसाठी बंद झाला.रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाल्याची खबर पोलिसांना मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRatnagiriरत्नागिरी