शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

आंबेरीत कनिष्ठ अभियंता जाळ्यात‘

By admin | Updated: February 3, 2017 23:59 IST

लाचलुचपत’ची कारवाई; दोघांना अटक

देवगड : देवगड तालुक्यामधील तिर्लोट आंबेरी येथील पतन विभागामार्फत बांधकाम करण्यात आलेल्या निवारा शेड कामाच्या मंजूर रकमेचे बिल काढून देण्याकरिता देवगड पतन उपविभागाचे सहायक अभियंता सुहास भास्कर जाधव (वय ५५) यांनी अडीच लाख रुपयांची मागणी एका ठेकेदाराकडे केली होती. त्यापैकी ५० हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंता स्वप्निल पांडुरंग वाघमोडे (२४) यांना सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.सुहास जाधव व स्वप्निल वाघमोडे यांच्या विरोधात देवगड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून स्वप्निल वाघमोडे यांना ताब्यात घेतले आहे, तर सुहास जाधव यांना मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास देवगड पतन विभाग कार्यालयामध्ये केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, तिर्लोट आंबेरी येथे पतन विभागामार्फत खाडी किनारी निवारा शेडचे काम तालुक्यातील वाडा गावातील एका ठेकेदाराने घेतले होते. हे काम ९ लाख ५० हजार रुपयांचे होते. या कामाच्या मंजूर रकमेचे बिल काढून देण्याकरिता देवगड पतन उपविभागाचे सहायक पतन अभियंता सुहास भास्कर जाधव यांनी तीन लाख रुपयांची मागणी ठेकेदाराकडे केली होती. ठेकेदार व जाधव यांच्यात तडजोड होऊन अडीच लाख रुपयांचा तोडगा निघाला. यापैकी ९० हजार रुपये यापूर्वी जाधव यांच्याकडे दिले होते. यानंतर ठेकेदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाधव यांची तक्रार दिली होती. यानंतर राहिलेल्या १ लाख ६० हजारापैकी ५० हजार रुपयाचा हप्ता जाधव यांच्याकडे देण्यासाठी बुधवारी १ तारखेला तक्रारदार ठेकेदाराने फोन केला. तेव्हा जाधव हे मुंबईला असल्याने त्यांनी ५० हजार रुपये कनिष्ठ अभियंता स्वप्निल वाघमोडे यांच्याकडे देण्यास सांगितले. यावरून तक्रारदाराने ५० हजार रुपये स्वप्निल पांडुरंग वाघमोडे यांच्याकडे देत असताना शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास देवगड पतन विभागाच्या कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात स्वप्निल वाघमोडे यांना पकडले आहे. (प्रतिनिधी)