शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

‘गॅस स्टँपिंग’साठी आता जूनअखेरची डेडलाईन

By admin | Updated: June 23, 2016 01:19 IST

नीता शिंदे : केरोसीन उचल करणाऱ्या गॅस ग्राहकांना अनिवार्य

रत्नागिरी : उच्च न्यायालयाने गॅस जोडणीची नोंद करणे अनिवार्य केले आहे. काही शिधापत्रिकांवर गॅस जोडणी शिक्का नसल्याचा गैरफायदा घेत ग्राहक केरोसीनची उचल करतात. ही शक्यता लक्षात घेत जिल्हा पुरवठा विभागाकडून सिलिंडरधारकांना ‘गॅस स्टँपिंग’ पूर्ण करून घेण्यासाठी जून अखेरची मुदत देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी नीता शिंदे - सावंत यांनी दिली.शासनाने सप्टेंबर २०१५पासून गॅस जोडणी असलेल्या शिधापत्रिधारकांना केरोसीन बंद केले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३१ मार्च २०१६पर्यंत ‘गॅस स्टँम्पिंग मोहीम’ पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्यामधील गॅस एजन्सींकडून गॅस जोडणीधारकांची यादी प्रत्येक जिल्ह््यातील पुरवठा कार्यालयाने मागवली होती.राज्य शासनाने सप्टेंबर २०१५पासून गॅस जोडणी असलेल्या शिधापत्रिधारकांना केरोसीन बंद केले आहे. रत्नागिरी जिल्ह््यात एकूण ४,२३,९६८ शिधापत्रिकाधारक असून, ‘गॅस स्टँम्पिंग मोहीम’ पूर्ण झाल्यानंतरच यापैकी किती ग्राहकांकडे गॅस जोडणी आहे, हे निश्चित होणार आहे. यासाठी जिल्ह््यातील रेशनदुकानदारांकडे गॅस एजन्सीकडून प्राप्त झालेली गॅस जोडणीधारकांची यादी देण्यात आली असून, त्यानुसार आता ‘गॅस स्टँम्पिंग’ची जबाबदारी रेशनदुकानदारांकडे देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिधापत्रिकेवर गॅस सिलिंडरची नोंदणी न केलेल्या ग्राहकांचे केरोसीन थांबविणे शक्य होणार आहे. शिधापत्रिकेवर गॅस जोडणी शिक्का नसल्याचा गैरफायदा घेत केरोसीनची उचल केल्यास संबंधित ग्राहकावर कारवाई होणार असल्याने आपोआपच या प्रकारावर अंकुश येणार आहे.ज्या ग्राहकांनी अजूनही शिधापत्रिकेवर गॅस नोंदणी केलेली नाही, त्यांनी संबंधित रेशनदुकानदाराकडे ३० जूनपर्यंत ही नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नीता शिंदे - सावंत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)आवाहन : नोंदणी त्वरित करावीजिल्ह््यात ग्राहकांकडे गॅसजोडणी असूनही त्यांनी रेशनकार्डवर त्याची नोंदणी करून घेतलेली नाही, असे प्रकार असू शकतात. त्यामुळे ज्यांना केरोसीनचा पुरवठा होत आहे. त्या ग्राहकांनी तत्काळ गॅसनोंदणी शिधापत्रिकेवर करून घेण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.