शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रूही शिंगाडेचा खेळाडू ते तालुका क्रीडाधिकारी असा थक्क करणारा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 12:36 IST

ड्रॉफीजममुळे इतरांप्रमाणे उंची नाही. परंतु, याची कधीच खंत न बाळगता खेळाकडे लक्ष केंद्रित केले. आई-वडिलांचे संस्कार व शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे खेळामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले. महाराष्ट्र शासनानेदेखील याची दखल घेत मानाचा एकलव्य पुरस्कार देऊन गौरविले.

ठळक मुद्देरूही शिंगाडेचा खेळाडू ते तालुका क्रीडाधिकारी असा थक्क करणारा प्रवासमानाचा एकलव्य पुरस्कार देऊन गौरव

मेहरून नाकाडे 

रत्नागिरी : ड्रॉफीजममुळे इतरांप्रमाणे उंची नाही. परंतु, याची कधीच खंत न बाळगता खेळाकडे लक्ष केंद्रित केले. आई-वडिलांचे संस्कार व शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे खेळामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले. महाराष्ट्र शासनानेदेखील याची दखल घेत मानाचा एकलव्य पुरस्कार देऊन गौरविले. शिवाय थेट नियुक्तीमध्ये खेड तालुका क्रीडाधिकारीपदी रूही शिंगाडे यांची नियुक्ती झाली. इतरांपेक्षा देवाने रूहीला अधिक गुणवत्ता दिल्यामुळे शैक्षणिक व क्रीडाक्षेत्रात तिने स्वत:चे नैपुण्य सिध्द केले आहे.सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा रूहीची उंची कमी आहे. परंतु, रूहीचे कुठेही अडले नाही. दहावीनंतर अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी नागपुरात गेलेल्या रूहीला खेळण्याचा सल्ला मिळाला. लागलीच तिने विजय मुनिश्वर यांच्याकडे पॉवरलिफ्टिंगचे प्रशिक्षण सुरू केले. राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथमच सहभागी होत तिने कनिष्ठ गटात सुवर्ण तर वरिष्ठ गटात कांस्यपदक पटकावले. येथून रूहीच्या खेळाची प्रगती सुरू झाली.

रूहीला बॅडमिंटनची प्रचंड आवड. शाळेत आल्यावर सोसायटीच्या आवारात मैत्रिणींबरोबर ती खेळत असे. मात्र, २०१३ साली बंगळुरु येथे झालेल्या वर्ल्ड ड्रॉपह्ण गेम्स या आॅलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होत एकेरी, दुहेरी, मिश्र एकेरी गटात सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

२०१५मध्ये लंडन येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरी गटात कांस्यपदक मिळवले. २०१७ साली कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड ड्रॉप आॅलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक तर साऊथ कोरिया येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात कांस्य पदक मिळवले. २०१७ चा महाराष्ट्र शासनाचा एकलव्य पुरस्कार तिने मिळवला.

नुकत्याच झालेल्या तिसऱ्या राष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेत एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी गटात तिने सुवर्णपदक मिळवले. तिन्ही गटात सुवर्णपदक प्राप्त करणारी राज्यातील ती पहिली खेळाडू ठरली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धा दर दोन वर्षानी होते. यावर्षी आॅगस्टमध्ये स्वित्झर्लंड येथे ही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे रूहीने आतापासूनच सराव सुरू केला आहे. शासनाने दिलेल्या थेट नियुक्तीतून रूहीची निवड खेड क्रीडाधिकारीपदी झाली असून, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तिने पदभार स्वीकारला आहे.आई-वडिलांचा पाठिंबाजन्मत: ड्रॉफीजम या प्रकारचे अपंगत्व असले तरी मला आई-वडिलांनी दिलेल्या सबळ प्रोत्साहनामुळेच मी यश संपादन करू शकले आहे. माझी क्रीडा क्षेत्रातील घोडदौड पाहून माझे धाकटे जुळे भाऊ कराटेपटू बनले आहेत. शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांचाही मला भक्कम पाठिंबा लाभला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी