खेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा दि. २३ रोजी सायंकाळी खेडमध्ये येत आहे. कशेडी घाट येथे यात्रेचे स्वागत करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे.
तालुक्यातील खवटी, बोरघर, भरणेनाका व लोटे अशा काही ठिकाणी या यात्रेचे स्वागत करण्याचे नियोजन करण्यासाठी खेडमध्ये कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला भाजप तालुकाध्यक्ष अनिल भोसले, जिल्हा उपाध्यक्ष राजू रेडीज यांच्यासह परशुराम जोशी, विनोद चाळके, रमेश भागवत, संजीवनी शेलार, कोमल खेडेकर, नागेश धाडवे, संजय बुटाला, जगदीश आंब्रे, शहराध्यक्ष अनिकेत कानडे, उदय बोरकर, वैजेश सागवेकर, दिनेश पोफळकर, भूषण काणे, विजय सकपाळ, संजय आंब्रे, अनंत कांदेकर, विकास तांबे, मिलिंद शिंदे, संतोष दोडेकर, सुरेश हंबीर यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.