शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

जैतापूर नळपाणी योजनेचे वाजले की...

By admin | Updated: December 16, 2014 23:41 IST

बाजारवाडीचा समावेश कधी : सरपंच म्हणतात फेर टेंडरिंग प्रोसेस होणार

जैतापूर : जैतापूर ग्रामपंचायतीमार्फ त राबवण्यात येत असलेल्या नळपाणी योजनेतून पाणी येत नसल्याने ही योजना अपयशी ठरली आहे. जैतापूर गाव खाडीकिनारी असल्याने या भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासते. ग्रामस्थांना ३०० ते ३५० रुपये दराने कित्येक लीटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. नळपाणी योजनेचा विषय ग्रामसभेत सातत्याने चर्चेला घेतला जातो. मात्र, ग्रामस्थांना थातूरमातूर उत्तरे देण्यात येतात. या नळपाणी योजनेसाठी अनंतवाडी, माजरेकरवाडी या भागाकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ई टेंडर नंबर १/१३-१४ ग्रामपंचायत, जैतापूर रक्कम रुपये २७,७४,०८३, दहा महिन्यांची मुदत ठेकेदाराला देण्यात आली होती. ८ आॅगस्ट २०१४ रोजी टेंडर वेबसाईटवर अपलोड करण्यात आले. २५ आॅगस्ट ही अंतिम तारीख ठेवून दुपारी ३ वाजता ते खुले करण्यात येणार होते. सदर टेंडर कोणीही घेतले नाही. अगर आजपर्यंत फेरटेंडर काढण्याची तसदी घेण्यात आली नाही. प्रत्यक्षात दळे ग्रामपंचायत हद्दीतून होळी गावच्या आरोग्य केंद्राच्या जिल्हा परिषद मालकीच्या विहिरीवरुन जैतापूर ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठा होणार आहे. ही बाब दळे येथील सरपंचांना कळविल्यानंतर त्यांनी या गोष्टीला विरोध केला आहे.या नळपाणी योजनेविषयी राजापूरचे उपशाखा अभियंता आर. एल. लटाळ यांना विचारले असता ग्रामपंचायतीने फेरटेंडर काढायला पाहिजे व दळे गावचा विरोध शमला पाहिजे, तरच ही नळ योजना दोन वाडीसाठी कार्यरत करता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. आम्ही या योजनेसंदर्भात पुन्हा टेंडर काढणार असल्याचे या सर्व प्रकाराबाबत सरपंच शैलजा माजरेकर यांनी सांगितल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)बाजारवाडीमध्ये चव्हाटावाडी, मधीलवाडा, मालीम गल्ली, काझी गल्ली, मुखरी गल्ली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. ग्रामपंचायतीने नळपाणी योजनेचा प्रस्ताव पाठवताना बाजारवाडीला वगळून प्रस्ताव पाठवला होता. त्यावेळी येथील सदस्य मूग गिळून गप्प बसले होते काय? असा सवाल बाजारवाडीतील नळधारकांनी विचारला आहे. ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा एक व काँग्रेसचे दोन असे एकूण तीन सदस्य विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत.