शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

जगबुडी पुलावरुन पुन्हा वाहतूक बंद, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 21:05 IST

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर खेड तालुक्यात पुन्हा पावसाने धुडगूस घालायला सुरवात केली असल्याने जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागली आहे.

खेड : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर खेड तालुक्यात पुन्हा पावसाने धुडगूस घालायला सुरुवात केली असल्याने जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रात्री ८ वाजता जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  जगबुडीसह नारिंगी नद्यांच्या पाण्याची पातळीही वाढल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांसह शहरातील व्यापा-यांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.   गेल्या आठवड्यात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. खेडची जगबुडी व चिपळूणची वाशिष्ठी या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सकाळपासून खेड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली. जगबुडी नदीचा उगम असलेल्या सह्याद्रीच्या खो-यात जोरदार पाऊस झाल्याने सायंकाळच्या वेळेला जगबुडी नदीच्या पातळीने धोक्याची पातळी ओलांडली.जगबुडीचे पाणी जुन्या पुलाला पोहोचण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी  खेडचे तहसीलदार शिवाजी जाधव यांना देताच जाधव यांनी तात्काळ जगबुडी पुलावर धाव घेतली. दरम्यान खेड पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी  मदत ग्रुपचे सदस्यांच्या मदतीने रात्री ८ वाजता जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद केला. पूल बंद झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या होत्या. जगबुडी पुलावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.