शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

खोक्याला बळी पडले नाहीत म्हणूनच चौकशी, खासदार विनायक राऊतांचा आरोप

By अरुण आडिवरेकर | Updated: October 14, 2022 13:26 IST

कितीही एसीबी लावा, एलसीबी लावा, सीबीआय लावा, ईडी लावा वैभव नाईक आणि राजन साळवी हे दबावाला बळी पडणार नाहीत

रत्नागिरी : वैभव नाईक, राजन साळवी हे मातोश्रीचे प्रामाणिक शिलेदार आहेत. निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते यांच्या खोक्याला बळी पडले नाहीत. त्यांनी निष्ठा, श्रद्धा जपली आणि खाल्ल्या मिठाला ते जागले आहेत. खोक्याला दबले नाहीत म्हणून कोणत्या ना कोणत्या एजन्सीचा दबाव टाकायचा. २००२ पासूनचे व्यवहार तपासायचे, कटकारस्थान करायचे हे अत्यंत खाणेरड राजकारण आहे, असे मत रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी खासदार विनायक राऊत आज, शुक्रवारी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, असे तुम्ही कितीही एसीबी लावा, एलसीबी लावा, सीबीआय लावा, ईडी लावा वैभव नाईक आणि राजन साळवी हे दबावाला बळी पडणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळ येथे १८ ऑक्टोबर रोजी शिवसैनिकांनी मोर्चाचे आयोजन केल्याचे खासदार राऊत म्हणाले.मुलांनाही सोबत घेऊन जानारायण राणे यांना दक्षिण मुंबईची जबाबदारी दिली आहे, त्यावर खासदार राऊत म्हणाले की, ज्यांनी जबाबदारी दिली त्यांचे मी आभार मानतो. नारायण राणे आणि पनवती हे समीकरण यापूर्वी मुंबई, सिंधुदुर्गात दिसून आली आहे. पुन्हा दिसेल. बरोबर दोघांनाही घ्या, एकटल्यालाच नको बापाबरोबर दोन्ही बेट्यांनाही घ्या, असे खोचकपणे सांगितले.अवधूत तटकरेंचा शिवसेनेशी संबंध नाहीअवधूत तटकरे आणि शिवसेना यांचा काहीही संबंध नाही. त्यांना आमचे मानत नाही ना त्यांनी शिवसेनेला आपल मानलं. शिवसेनेच लेबल लावून भाजपमध्ये प्रवेश करायचा असेल तर तो त्यांच्या समाधानाचा विषय असेल.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVaibhav Naikवैभव नाईक Rajan Salviराजन साळवीVinayak Rautविनायक राऊत Shiv Senaशिवसेना