शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लांजाच्या नगराध्यक्ष अपात्र

By admin | Updated: May 5, 2017 23:34 IST

पतीने केलेल्या अनधिकृत बांधकामाचा ठपका; जिल्ह्यातील पहिलीच घटना

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : पतीने केलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल लांजाच्या नगराध्यक्ष संपदा योगेश वाघधरे यांना जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी नगराध्यक्ष तसेच सदस्यपदासाठीही अपात्र ठरविले आहे. लांजा नगरपंचायतीत राष्ट्रवादी-भाजपच्या शहर विकास आघाडीची सत्ता असून, वाघधरे यांच्या अपात्रतेनंतरही सत्तेला धक्का न बसण्याइतके संख्याबळ आघाडीकडे आहे.संपदा वाघधरे या जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सदस्या म्हणून लांजा नगरपंचायतीत निवडून आल्या. शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या शहर विकास आघाडीने ही निवडणूक लढविली होती. पहिल्याच वर्षी वाघधरे यांना नगराध्यक्ष पद देण्यात आले. सुमारे सव्वा दोन वर्षे त्या लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यपदाचा कार्यभार सांभाळत होत्या. मात्र, या कालावधीत त्यांचे पती योगेश वाघधरे यांनी शासकीय विश्रामगृहानजीक एका इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. या इमारतीच्या मंजूर आराखड्यापेक्षा अधिक बांधकाम त्यांनी विनापरवाना केले होते. याबाबत लांजा नगरपंचायतीचे सदस्य सुनील कुरूप यांनी आॅक्टोबर २०१६ मध्ये जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्याकडे याचिका दाखल केली होती. पत्नीच्या पदाचा गैरवापर करून योगेश वाघधरे अनधिकृत बांधकाम करीत असल्याने नगराध्यक्ष संपदा वाघधरे यांना अपात्र करण्याची मागणी त्यांनी केली होती. बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी यावर अंतिम निर्णय देताना संपदा वाघधरे यांना नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरपंचायतीच्या सदस्य पदासाठीही अपात्र ठरविले आहे. तसे आदेश त्यांनी संपदा वाघधरे यांना दिले आहेत.शहर विकास आघाडीचे ११ आणि शिवसेनेचे सहा सदस्य या नगरपंचायतीत निवडून आले आहेत. आता शहर विकास आघाडीची एक जागा कमी होऊन निवडणूक होणार असली तरी सत्ता शहर विकास आघाडीकडेच राहणार आहे. आघाडीतील चर्चेनुसार आता हे पद भाजपकडे जाणार आहे.