शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औषधसाठा चौकशीसाठी समिती नेमणार : इंदूराणी जाखड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 14:28 IST

कोल्हापूर येथून औषधांचा साठा घेऊन आलेल्या त्या दोन गाड्यांमधील औषधांच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेमण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली.

ठळक मुद्देऔषधसाठा चौकशीसाठी समिती नेमणार : इंदूराणी जाखडसध्या चौकशी समितीच्या चौकशीकडे लक्ष

रत्नागिरी : कोल्हापूर येथून औषधांचा साठा घेऊन आलेल्या त्या दोन गाड्यांमधील औषधांच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेमण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली.सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर येथून औषधांचा साठा घेऊन आलेल्या दोन गाड्यांची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांना कळताच त्यांनी याबाबत महसूल विभागाला तातडीने कल्पना दिली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून लगेचच या गाड्या तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आल्या.

या गाड्यांमधील औषध साठ्यांची तपासणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर रत्नागिरीचे प्रांत डॉ. विकास सुर्यवंशी आणि तहसीलदार शशिकांत जाधव तसेच पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यात औषधांचे २८ बॉक्स आढळून आले.

खासगी वाहतूक करणाऱ्या या गाड्यांच्या चालकांकडे औषध पुरविण्याची पावती होती. मात्र, त्यांच्याकडे ही औषधे कुणी आणि कशासाठी मागवली याबाबतची माहिती मिळू शकली नाही, त्यामुळे याबाबतचा संशय अधिक बळावला आहे.हा सर्व औषधाचा साठा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सुपुर्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी अहवाल तयार केला असून यासाठी चौकशी समिती नेमण्यात येणार आहे.

यात जिल्हा परिषद, अन्न व औशध प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग यांचे प्रतिनिधी असतील. या समितीमार्फत या औषधसाठप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर याप्रकरणी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अधीनस्थ हा निर्णय असल्याचे डॉ. जाखड यांनी सांगितले. त्यामुळे चौकशी समितीच्या चौकशीतून या औषधसाठ्याप्रकरणी सत्य पुढे आल्यानंतरच नेमके दोषी कोण, याचे उत्तर सापडणार आहे. त्यामुळे सध्या चौकशी समितीच्या चौकशीकडे लक्ष वेधून राहिले आहे.

टॅग्स :medicineऔषधंRatnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटल