शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'संगणक परिचालकांना ग्रामपंचायत सेवेत सामावून घ्या'

By मेहरून नाकाडे | Updated: June 7, 2023 17:45 IST

गेली ११ वर्षे संग्राम व आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरून नागरिकांना आॅनलाईन, आॅफलाईन सेवा देण्याचे काम

रत्नागिरी : ग्रामपंचायतस्तरावर कार्यरत संगणक परिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधात सर्वच ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालक /डाटा एंट्री आॅपरेटर या स्वतंत्र पदाची निर्मिती करून किमान वेतन देण्याची व सध्या कार्यरत असलेल्या सर्व संगणक परिचालकांना या पदावर सामावून घेण्याची शासनास शिफारस करून न्याय द्यावा अशी मागणी रत्नागिरी जिल्हा संगणक परिचालक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांना सादर करण्यात आले आहे.गेली ११ वर्षे संग्राम व आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरून नागरिकांना आॅनलाईन, आॅफलाईन सेवा देण्याचे काम संगणक परिचालक करीत आहेत. कोरोनाकाळातही कामगिरी बजवताना १९ संगणक परिचालकांनी आपला जीव गमावला आहे. शेतकरी कर्जमाफी, प्रधानमंत्री घरकूल योजनेतंर्गत ५४ लाख कुटूंबाचा सर्व्हे याच संगणक परिचालकांनी केला आहे. निवडणूक विभाग, नरेगा विभाग, जनगणना, पीएम किसान योजना, पिकविमा योजना, ग्रामपंचायतीचे आॅनलाईन, आॅफलाईन काम प्रामाणिकपणे करून सुध्दा ६९३० रूपये हे महागाईच्या काळात तुटपूंजे मानधन दिले जाते, शिवाय ते कधीच वेळेवर नसते.ग्रामपंचायतीमध्ये बसून संगणक परिचालक सेवा बजावत असल्याने त्यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे आवश्यक असून ग्रामविकास विभागाने स्थापन केलेल्या यावलकर समितीने २०१८ मध्ये सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारीत आकृतीबंधात पटनिर्मिती करण्याची शिफारस केली आहे. त्यात ग्रामपंचायत स्तरावर माहिती तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता शासनाच्या सर्व योजना नागरिकांना आॅनलाईन देण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे ग्रामपंचायतस्तरावर डेटा एंट्री आॅपरेटर/ संगणक परिचालक या पदाची कायमस्वरूपी निर्मिती करून किमान वेतन देणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनस्तरावर राज्य संघटनेच्या माध्यमातून डाटा एंट्री आॅपरेटर गेली अनेक वर्ष मागणी करत आहेत. गेली अनेक वर्षे सेवा बजावणाऱ्या संगणक परिचालक न्याय देत स्वतंत्र पदाची निर्मीती करून किमान वेतनाची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी रत्नागिरी जिल्हा संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष हरीष वेदरे, आसिफ नाकाडे, शिवराज भुवड, सीमा शेवडे, गायत्री साळवी, चंद्रकांत लिंगायत उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी