शहरं
Join us  
Trending Stories
1
"BMC आयुक्त कोण आहे, नाव लिहून ठेवा; कंट्रोल मुख्यमंत्र्यांकडेच आहे..."; मनोज जरांगेंचा इशारा
2
शरद पवारांचा 'सुसाईड बॉम्ब' म्हणून जरांगेंकडे पाहतात; भाजपा आमदार संजय केनेकरांचं खळबळजनक विधान
3
Maratha Morcha Mumbai video: "मला मारलं, यांच्याकडे हत्यारं"; जखमी असल्याचे नाटक, मराठा आंदोलनात गोंधळ घालणाऱ्याला पकडले
4
Manoj Jarange Patil Morcha Update Live: अमित शाह मुंबईत, मराठा आरक्षणावर एकनाथ शिंदेंशी तासभर चर्चा
5
आंदोलने, धरणे अन् मोर्चे आझाद मैदानावरच का? मंत्रालय, सचिवालयापर्यंत परवानगी नाही; श्रेय उच्च न्यायालयाला
6
RCB कडून बंगळुरु चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत
7
राजीनाम्यानंतर जगदीप धनखड यांचा पेन्शनसाठी अर्ज, कोण कोणत्या सुविधा मिळणार?
8
Delhi Murder Video: भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, सेवेकऱ्याला जीव जाईपर्यंत मारलं; दिल्ली हादरली
9
अमेरिकेचे नवं पाऊल...भारताला बसू शकतो मोठा झटका; १.६ अब्ज डॉलर्स गुंतवणूक धोक्यात
10
'शोले'मधून सचिन पिळगावकरांचा 'हा' सीन केलेला कट, पण फोटो आला समोर; अभिनेत्याला वाटलेलं वाईट
11
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता वाढताच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल पहिला निर्णय
12
जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
13
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
14
Dilshan Madushanka ODI Hattrick : या पठ्ठ्यानं अखेरच्या षटकात हॅटट्रिकचा डाव साधत फिरवली मॅच
15
रितेश देशमुखचा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाला- "मनोज जरांगेजी हे..."
16
"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
17
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
18
'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...
19
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
20
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...

लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून संसर्गाचा धोका अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:33 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. या अनुषंगाने आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढविली असून लसीकरणावरही भर दिला ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. या अनुषंगाने आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढविली असून लसीकरणावरही भर दिला आहे. मात्र, सध्या ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याने या लोकांपासून अन्य लोकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे.

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांकडून योग्यरीत्या खबरदारी घेतली जात होती. कोरोनाच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझर यांचे पालन योग्यरीत्या केले जात होते. तसेच संचारबंदी सुरू असल्याने लोकांची गर्दीही थांबली होती. मात्र, मे महिन्यात लाॅकडाऊन शिथिल होताच मुंबईहून मोठ्या संख्येने आलेल्या चाकरमान्यांमुळे पुन्हा काेराेना रुग्णांचे प्रमाण वाढले. यावेळी ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती अशांकडून संसर्ग झाल्याने स्थानिक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमालीची वाढली. आरोग्य यंत्रणेच्या अथक सेवेमुळे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत तसेच कोरोनाने मृत्यू होण्याच्या घटनेत घट होऊ लागली.

मात्र, डिसेंबर महिन्यात लाॅकडाऊन पूर्णपणे शिथिल झाल्याने लोकांना काेरोना गेला असे वाटले. त्यामुळे त्यांच्यात बेफिकिरी मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक वाढावी, यासाठी शासनाने १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू केले आहे. मात्र, नागरिकांमध्ये कोरोना लस घेण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे.

त्यातच आता पुन्हा शिमग्यासाठी कोकणात आलेल्या मुंबइकरांमुळे पुन्हा गेल्या वर्षीच्या कोरोना स्थितीची पुनरावृत्ती होऊ लागली आहे. कोरोनाच्या या बदलत्या रूपात सौम्य परिणाम असले तरी संसर्ग अधिक प्रमाणात होत आहे. त्यातच ज्यांच्यात अजिबातच लक्षणे नाहीत, अशा व्यक्तींचा संचार सर्वत्र होत आहे. अशा व्यक्तींमध्ये लक्षणे नसली तरी हे रुग्ण अनेकांना बाधित करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग जलद गतीने फैलावत आहे. ज्या व्यक्तींना त्रास होतो, त्या व्यक्ती उपचारासाठी पर्यायाने चाचणीसाठी येत आहेत. मात्र, ज्यांच्यात लक्षणे नाहीत, अशा व्यक्तींची चाचणी होत नाही. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा यावेळी कोरोनाचा संसर्ग अधिक जलद गतीने होताना दिसत आहे.

चौकट

लोक त्रास झाल्याशिवाय कोरोना चाचणी करण्यास पुढे येत नाहीत. चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल मिळेपर्यंत त्या व्यक्तीने स्वत: विलगीकरणात राहणे गरजेचे असते. मात्र, चाचणी दिल्यानंतर अहवालाची प्रतीक्षा न करता अनेक व्यक्ती इतरत्र फिरत असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे.

चौकट

लक्षणे नसलेल्या व्यक्तींकडून घरातील गंभीर आजाराचे रुग्ण, वृद्ध व्यक्ती कोरोनाबाधित होत आहेत. त्यांना त्रास झाल्यानंतर काही दिवसात रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची चाचणी केली जाते. ते पाॅझिटिव्ह आले तरच घरातील सर्वांची चाचणी घेण्यात येते. मात्र, यासाठीही काही दिवस उलटून गेल्याने त्यानंतर लक्षणे नसलेल्या व्यक्तीचा अहवालही निगेटिव्ह येतो. मात्र, या काळात या व्यक्तीकडून अनेक व्यक्तींना संसर्ग होतो.

कोट

रॅपिड ॲंटिजेन चाचणी अहवालाची विश्वासार्हता ३० टक्के आहे. मात्र, स्वॅब चाचणी खात्रीशीर असल्याने जिल्हा रुग्णालयात या चाचणीवर अधिक भर दिला जात आहे. मात्र, ज्यांना त्रास होतो, अशाच व्यक्तींच्या चाचण्या केेल्या जात आहेत. मात्र, ज्यांना लक्षणे नाहीत, अशा व्यक्ती चाचण्यांसाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे याच व्यक्तींकडून घरातील गंभीर आजारांचे रुग्ण तसेच ज्येष्ठ नागरिक कोरोनाबाधित होत आहेत. या लोकांनी जबाबदारीने वागून कोरोना नियमांचे पालन करायला हवे.

- डाॅ. संघमित्रा फुले-गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी