शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

रत्नागिरी फाटक प्रशालेत आधुनिक प्रयोगशाळा, अटल टिंकरिंग लॅब, २५ रोजी प्रयोगशाळेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 17:16 IST

केंद्र शासनाच्या वतीने नीती आयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधून स्वतंत्रपणे वैज्ञानिक विचार करणारे, संशोधनवृत्तीचे नागरिक निर्माण व्हावेत, यासाठी अटल टिंकरिंग लॅब हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी फाटक प्रशालेत आधुनिक प्रयोगशाळाअटल टिंकरिंग लॅब, २५ रोजी प्रयोगशाळेचे उद्घाटनदेशातील ५०० शाळांमध्ये निवड

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या वतीने नीती आयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधून स्वतंत्रपणे वैज्ञानिक विचार करणारे, संशोधनवृत्तीचे नागरिक निर्माण व्हावेत, यासाठी अटल टिंकरिंग लॅब हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमासाठी देशातील १३,५00 शाळांपैकी ५०० शाळा निवडण्यात आल्या असून, जिल्ह्यातील दि न्यु एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलची निवड झाली आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून २५ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती या संस्थेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. सुमिता भावे, मुख्याध्यापिका शुभांगी वायकुळ तसेच या प्रयोगशाळेचे प्रमुख राजीव गोगटे उपस्थित होते. ही शाळा २०२० साली शतक पूर्ण करणार आहे. शतक महोत्सवाकडे वाटचाल करीत असतानाच शाळेने हे यश मिळवले आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी शाळेने विविध निकष, मुलाखती तसेच सादरीकरणात आघाडी घेतल्याने अखेर निवड झाली आहे.या प्रयोगशाळेसाठी संस्थेने जागा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील ही एकमेव प्रयोगशाळा आहे. संस्थाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब परूळेकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या फाटक हायस्कूलच्या वाटचालीतील हा एक मैलाच दगड मानला जात आहे.

या उपक्रमासाठी नीती आयोगाच्या मार्गदर्शनानुसार ८ लाख रूपयांची उपकरणे व साहित्य खरेदी करण्यात आले आहे. यात थ्री डी प्रिंटर, ड्रोन, रोबोटिक्स, कीट्स, इलेक्ट्रॉनिक्स सेंसर आदींचा समावेश आहे. तसेच दरवर्षी २ लाख याप्रमाणे पाच वर्षे या उपकरणांच्या दुरूस्ती व देखभालीसाठी निधी दिला जाणार आहे.

या प्रयोगशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध शाळांच्या सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध प्रयोग करण्याची तसेच त्यातून संशोधनाची संधी आहे. विद्यार्थ्यांनी ही उपकरणे स्वत: हाताळावीत तसेच त्यातून त्यांना विज्ञानाबाबत आवड निर्माण व्हावी, हा प्रमुख हेतू आहे. याचबरोबर मुलांच्या सुरक्षिततेचीही पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. शिक्षक व इतर विज्ञानप्रेमींनाही यात पूर्व परवानगी घेऊन प्रयोग करता येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

ही प्रयोगशाळा अतिशय वेगळ्या प्रकारची असल्याने सुरूवातीला या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी २५ सत्र घेण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळेचे उद्घाटन २५ रोजी सकाळी ११ वाजता फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या उपस्थितीत होणार आहे.यासाठी स्थानिक स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. यात इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग, प्रोटोटाईप आदी क्षेत्रात सेवावृत्तीने योगदान देऊ इच्छिणाऱ्या मंडळींचा समावेश आहे. यात मुख्याध्यापक, प्रयोगशाळेचे प्रमुख यांच्यासह विज्ञान शिक्षकांसह इतर शिक्षक यांचे योगदान असणार आहे. निवडक विद्यार्थ्यांसाठी २३ व २४ डिसेंबर रोजी उद्घाटनपूर्व प्रशिक्षण होणार असून, या कार्यशाळेत तयार केलेल्या काही साधनांचे प्रदर्शन २५ रोजीच्या उद्घाटन समारंभादरम्यान होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNIti Ayogनिती आयोग