शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

परवाना न घेता लाऊडस्पीकरचा वापर केल्यास वाहने जप्त; जिल्हाधिकाऱ्यांचा राजकीय पक्षांना इशारा

By शोभना कांबळे | Updated: March 21, 2024 20:10 IST

आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, असेही दिले निर्देश

शोभना कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: रोड शो करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. दुचाकीला जास्तीत जास्त एक फूट बाय अर्धा फूट आकाराचा एकच ध्वज प्रदर्शित करण्याची परवानगी आहे. तीनचाकी, चारचाकी वाहनांवर बॅनरला बंदी, आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. आवश्यक परवाना न घेता लाऊडस्पीकरचा वापर करणारी वाहने जप्त केली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिला आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहितेबाबत येथील अल्प बचत सभागृहात उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांची गुरूवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी यावेळी आदर्श आचारसंहितेबाबत सविस्तर संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये दुचाकीचा वापर, रोड शो बाबतची नियमावली, मिरवणुका आणि निवडणूक सभांमध्ये लाऊडस्पीकर, झेंड्यांचा वापर, तात्पुरते अभियान कार्यालय, एसएमएसचा गैरवापर रोखणे याबाबतचा समावेश होता. ते म्हणाले, स्थानिक कायदे, न्यायालयाचे आदेश किंवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांच्या अधिन राहून रात्री १० ते सकाळी ६ यावेळेत निवडणूक प्रचारासाठी वापरली जाणारी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, लाऊडस्पीकर किंवा साऊंड ॲम्लीफायर चालवता येणार नाही. न्यायालयाचे आदेश आणि स्थानिक कायद्यांच्या आधीन राहून प्रमुख रुग्णालये, ट्रॉमा सेंटर, रक्तपेढ्या आणि प्रचंड गर्दीच्या बाजारपेठांमध्ये जाणारे मार्ग टाळून, शक्य असेल तेव्हा सुट्टीच्या दिवशी किंवा गर्दी नसलेल्या वेळेत रोड शोचे वेळापत्रक ठेवावे. अपर जिल्हाधिकारी बर्गे यांनीही विविध नोडल अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

भयमुक्त आणि पारदर्शी वातावरण निवडणूक पार पडावी, यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी दक्ष रहायला हवे. विशेषत: आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल, यावर सुरुवातीपासूनच भर द्यावा. निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, केलेले पत्रव्यवहार याविषयी सखोल अवलोकन करावे. दिलेल्या जबाबदारीची योग्यरितीने अंमलबजावणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी सिंह यांनी दिल्या.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४