शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा निकाल ५ जूनपर्यंत ? निकालाचे काम आता अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 18:38 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देबारावीचा निकाल ५ जूनपर्यंत शक्य ? : शिक्षण मंडळनिकालाचे काम आता अंतिम टप्प्यात

सागर पाटील 

टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील सर्वच विभागीय मंडळांमध्ये निकालाची लगबग सुरू असून, निकाल वेळीच जाहीर करण्याचा प्रयत्न राज्य मंडळाकडून केला जात आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रवारी महिन्यांत राज्यात उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षां घेण्यात आल्या होत्या. कला, शास्त्र, वाणिज्य व व्होकेशनल शाखांमधून लाखो विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेच्या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी उत्तर पुस्तिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. शासन स्तरावर प्रलंबित असणाऱ्या आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने बहिष्काराचा मार्ग अवलंबला होता. यामुळे अनेक उत्तर पुस्तिका उशिरापर्यंत तपासल्या गेल्या नाहीत.या पार्श्वभूमीवर राज्यातील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. गतवर्षी राज्य मंडळाकडून बारावीचा निकाल २५ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यावर्षी हा निकाल ५ जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या अनुषंगाने विविध निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न राज्य मंडळाकडून केला जात आहे. प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे उत्तर पुस्तिका तपासण्यास उशीर झाला असल्याने निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे.३३ हजार विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत !शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास ३३६४७ विद्यार्थी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला बसले होते. कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेपासून राज्यात सर्वाधिक निकाल देण्याची परंपरा या वर्षीदेखील कायम राहील, असा विश्वास विभागातून व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :examपरीक्षाRatnagiriरत्नागिरी