शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नियम डावलून चिपळूणचा विकास होणार कसा : विजय कदम

By admin | Updated: April 18, 2017 13:47 IST

शिवसेना स्टाईलने वेळेचे महत्त्व पटवून देण्याची वेळ

आॅनलाईन लोकमतचिपळूण , दि. १८ : : चुकीच्या पद्धतीने विकास कामे मार्गी लावण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न पूर्ण चुकीचा असून त्याला शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेला विरोध हा योग्य आहे. कामाची वर्कआॅर्डर ठेकेदाराला दिल्यानंतरही जर नगराध्यक्षा सुरेखा खेराडे जाणीवपूर्वक कामाच्या भूमिपूजनास उशीर करत असतील तर ही बाब विकासाला हानीकारण आहे. जी भुयारी गटार योजना अस्तित्वात येणे शक्य नाही. त्यासाठी वायफळ प्रयत्न करुन प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे. तसेच मुख्याधिकारी हे लेटलतिफ झाले असून त्यांना शिवसेना स्टाईलने वेळेचे महत्त्व पटवून देण्याची वेळ आली असल्याची टिका जिल्हा संपर्क प्रमुख विजय कदम यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या राज्य घटनेने लोकशाही पद्धतीचा वापर सुरु केला. सर्वसामान्य नागरिकांवर कोणी अन्याय करु नये व अन्याय कोणी केला तर त्याला कायद्याच्या माध्यमातून शासन होणे गरजेचे आहे. चिपळूण शहरातील विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या कारभाराबाबत संपर्क प्रमुख कदम यांनी माहिती घेतली. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी कायदा डावलून विद्यमान नगराध्यक्षा खेराडे, मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी कसा कारभार सुरु ठेवला आहे याची माहिती दिली. यावेळी भुयारी गटार योजना, ८० लाख रुपयांचे बाजार पुलाचे बोगस बिल, अडीच कोटीचे वादग्रस्त रस्ते, एलईडी योजना, ८० लाख रुपयांची डजबीन खरेदी, भुयारी गटारासंदर्भात नागरिकांची होणारी दिशाभूल, वर्कआॅर्डर देवूनही काम करण्यास नगराध्यक्षांकडून होणारा जाणीवपूर्वक विलंब, शासनाचे विविध नियम धाब्यावर बसून ठेकेदारांची काढण्यात येणारी बिले या संदर्भात चर्चा झाली.

पेठमापातील कामाचे आदेश दिल्यानंतरही नगराध्यक्षांना वेळ नसल्यामुळे विकास काम सुरु होण्यास विलंब होणे हे अयोग्य आहे. यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. मुख्याधिकारी पाटील यांनी वेळेचे बंधन पाळणे गरजेचे असून त्यांच्याकडे जर नागरिकांना देण्यासाठी जर वेळ नसेल तर त्यांना वेळेच महत्त्व पटवून देण्याची ताकद शिवसेनेकडे आहे असे कदम यांनी सांगितले.

यावेळी शहरप्रमुख राजू देवळेकर, गटनेते शशिकांत मोदी, उमेश सकपाळ, नगरसेवक मोहन मिरगल, मनोज शिंदे, विकी नरळकर, नगरसेविका जयश्री चितळे, संजीवनी घेवडेकर, स्वाती दांडेकर, सुषमा कासेकर, सई चितळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)