शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील हॉटेल रत्नसागर प्रशासनाच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 21:19 IST

Hotel Ratnagiri- रत्नागिरीनजिकच्या रत्नसागर हॉटेलची मुदत संपल्याने ही जागा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. ही जागा एम.टी.डी.सी.ला पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यासाठी देण्यात आली होती. त्यानुसार एम.टी.डी.सी.च्या माध्यमातून रत्नसागर हॉटेलला ही जागा भाडेकरारावर देण्यात आली होती. मात्र, ही ३० वर्षांची मुदत संपल्याने आता जिल्हा प्रशासनाने ही जागा ताब्यात घेतली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीतील हॉटेल रत्नसागर प्रशासनाच्या ताब्यातआता बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर सुरू होईल

रत्नागिरी : रत्नागिरीनजिकच्या रत्नसागर हॉटेलची मुदत संपल्याने ही जागा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. ही जागा एम.टी.डी.सी.ला पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यासाठी देण्यात आली होती. त्यानुसार एम.टी.डी.सी.च्या माध्यमातून रत्नसागर हॉटेलला ही जागा भाडेकरारावर देण्यात आली होती. मात्र, ही ३० वर्षांची मुदत संपल्याने आता जिल्हा प्रशासनाने ही जागा ताब्यात घेतली आहे.रत्नागिरी शहरानजीकच्या बहुचर्चित मिऱ्या धूप संरक्षक बंधाऱ्यासाठी १९० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून बंधारा आणि ब्रेक वॉटर अशा दोन टप्प्यांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या सी.डब्ल्यू.पी.आर.एस. या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. बंधाऱ्यासाठी ११० कोटी मंजूर झाल्याने लवकरात लवकर हे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकारांना दिली.गेल्या अनेक वर्षापासून मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा विषय ऐरणीवर आलेला आहे. मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधारा वाहून गेल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात मिऱ्या पंधरामाड येथील मानवी वस्तीत समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसते. त्यामुळे येथील नागरिकांना भरतीच्या वेळी जीव मुठीत घेऊन राहावे लागते. या बंधाऱ्याचे काम कायमस्वरूपी व्हावे, यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून येथील नागरिक आंदोलन करत आहेत.या बंधाऱ्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दीड कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. आता पुन्हा या कायम बंधाऱ्याच्या कामासाठी राज्य शासनाकडून १९० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या सी.डब्ल्यू.पी. आर.एस. या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात बंधाऱ्याचे काम होणार आहे. त्यासाठी ११० कोटींच्या निधीला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :hotelहॉटेलRatnagiriरत्नागिरी