शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता ५२ जणांना पुन्हा घर दाखवणारी आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 14:33 IST

Police AshaWorker Ratnagiri-डोक्यावरचे छत जेव्हा जाते त्यावेळी आयुष्यच बदलून जाते. राग, गैरसमज किंवा कोणतीही घटना ही क्षणिक असते. अनेकदा रागाच्या भरात किंवा काही घटनांमुळे अनेकजण आपल्या घरापासून दुरावतात. अशा दुरावलेल्यांना पुन्हा त्यांच्या घरी परत आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी १ जानेवारीपासून राबवलेल्या आशा अभियानमुळे अनेकांना आधार मिळाला आहे. सन २००३पासून हरवलेल्या १८८पैकी ५२ जणांना पुन्हा त्यांच्या घरी आणण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देबेपत्ता ५२ जणांना पुन्हा घर दाखवणारी आशाजिल्हा पोलीस अधीक्षक गर्ग यांची संकल्पना

तन्मय दातेरत्नागिरी : डोक्यावरचे छत जेव्हा जाते त्यावेळी आयुष्यच बदलून जाते. राग, गैरसमज किंवा कोणतीही घटना ही क्षणिक असते. अनेकदा रागाच्या भरात किंवा काही घटनांमुळे अनेकजण आपल्या घरापासून दुरावतात. अशा दुरावलेल्यांना पुन्हा त्यांच्या घरी परत आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी १ जानेवारीपासून राबवलेल्या आशा अभियानमुळे अनेकांना आधार मिळाला आहे. सन २००३पासून हरवलेल्या १८८पैकी ५२ जणांना पुन्हा त्यांच्या घरी आणण्यात रत्नागिरीपोलिसांना यश आले आहे.अनेकदा शुल्लक कारणावरुन अनेकजण घर सोडतात किंवा काही दुर्दैवी घटनांमुळे काहींना घरापासून लांब जावे लागते. अशा अनेकांची मग फरपट होते आणि त्यांच्या नातेवाईकांचे आयुष्यच बदलून जाते. अनेकदा अशा घटना पोलीस स्थानकामध्ये बेपत्ता म्हणून नोंदवल्या जातात तर नातेवाईक नशिबावर हवाला ठेवून हरवलेल्या आपल्या माणसांची जन्मभर वाट पाहात राहतात. पोलिसांच्या दृष्टीने त्यांच्या कार्यालयात ती एक केस म्हणून राहते. परंतु, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मात्र यामध्ये विशेष लक्ष घातले.रत्नागिरी जिल्ह्यात २००३पासून १४९ महिला तर १८ वर्षांखालील ३९ मुले-मुली हरवली होती. त्यांच्या तपासासाठी डॉ. गर्ग यांनी पुढाकार घेत १ जानेवारीपासून ७ दिवसांसाठी ह्यआशा अभियानह्णला सुरुवात केली होती. प्रत्येक पोलीस स्थानकातील कर्मचारी निवडून बेपत्ता झालेल्या महिला आणि १८ वर्षांखालील मुले-मुलींना शोधण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले. हे अभियान केवळ ७ दिवसांपुरतेच मर्यादित न ठेवता, ते अद्यापपर्यंत सुरु ठेवण्यात आले आहे. या अभियानामुळे आतापर्यंत तब्बल ५२ जणांना पुन्हा त्यांच्या घरी जाता आले आहे.आशामुळे आशा...डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत २००३पासून बेपत्ता झालेल्या ५२ जणांना घरी परत आणण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये बेपत्ता झालेल्या १४९ महिलांपैकी ३४ महिला शोधण्यात पोलिसांना यश आले तर बेपत्ता झालेल्या १८ वर्षांखालील ३९ मुलांपैकी १२ मुली आणि ६ मुलांना घरी आणण्यात यश आले आहे. पोलिसांच्या आशा अभियानामुळे नवी आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी