शिक्षकांचा गाैरव
राजापूर : शिक्षक क्रांती संघटनेतर्फे जिल्ह्यातील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गाैरविण्यात आले. प्रमोद खरात, साधना कुलकर्णी, बाजीराव देवकाते, योगेश शेटे, मानसी विचारे, प्रकाश वीरकर, सुप्रिया गार्डी, श्रेया दळवी आदींचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
वाहतूक सुरू करण्याची मागणी
रत्नागिरी : रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी सुरू करण्याची मागणी रत्नागिरी जिल्हा मोटार मालक असोसिएशन तर्फे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांचेकडे करण्यात आली आहे.
लॅबचे उद्घाटन
दापोली : येथील ज्ञानदीप विद्यामंदिर येथे निती आयोग दिल्ली केंद्र शासन पुरस्कृत अटल टिकरींग लॅब मंजूर झाली होती. या लॅबचे उद्घाटन आर्किटेक इंजिनिअर संदीप जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तुषार जोशी संस्थेच्या कार्याध्यक्ष सरोज मेहता उपस्थित होते.
बासित नेवरेकरला सुवर्णपदक
लांजा : शहरातील बासित अल्ली सादिक नेवरेकर याने पेट्रो केमिकल इंजिनअरिंगमध्ये सुवर्णपदक संपादन केले आहे. लोणेरे येथील डाॅ. बाबासाहेब आंबडेकर टेक्नोलाॅजीकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेल्या बासितने ६५१ विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.