शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Divyang - अपंगत्वावर मात करून त्याची तेजस कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 17:54 IST

Divyang , Disability Development, ratnagiri जन्मत: अस्थिव्यंगाने ग्रस्त असलेल्या तेजसचे पालनपोषण करताना पालकांना विशेष काळजी घ्यावी लागली. मात्र, आपल्या दिव्यांगत्वावर मात करून तेजसने पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे.

ठळक मुद्देअपंगत्वावर मात करून त्याची तेजस कामगिरी

मेहरून नाकाडेरत्नागिरी : जन्मत: अस्थिव्यंगाने ग्रस्त असलेल्या तेजसचे पालनपोषण करताना पालकांना विशेष काळजी घ्यावी लागली. मात्र, आपल्या दिव्यांगत्वावर मात करून तेजसने पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे.कशेळी येथील सर्वसामान्य घरातील तेजस दशरथ फोडकर याचे वडील मजूर तर आई गृहिणी आहे. अन्य मुलांमध्ये तेजस मिसळू शकत नव्हता. पालकांना त्याची सातत्याने काळजी घ्यावी लागत होती. अभ्यासात प्रगती असल्याने त्याने दहावीनंतर कला शाखेत प्रवेश घेतला. दोन वर्षांपूर्वी त्याने बारावी पूर्ण केली. त्यानंतर मात्र तो घरीच होता. त्याच कालावधीत रत्नागिरी पॅराप्लेजिकल फाऊंडेशनचे सादिक नाकाडे यांच्याशी तेजसची ओळख झाली.

तेजसशी भेट झाल्यानंतर सादिक यांनी त्याला आत्मनिर्भर होण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घेण्यास सुचविले. तेजसने त्याचक्षणी स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्धार केला. गेल्यावर्षी त्याने पोल्ट्री व्यवसाय सुरू केला असून, व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.अपंगासाठी धडपडसादिक नाकाडे यांच्याशी बोलल्यानंतर तेजसला प्रेरणा मिळाली. त्यामुळे तेजसने दिव्यांगांसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार केला आहे. दिव्यांगानी कुढत न बसता, विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर होणे आवश्यक असून, त्यासाठीच तेजस धडपडत आहे. दिव्यांगांवर सहानुभूती दाखविण्यापेक्षा त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.व्यवसाय वाढविणारतेजसने गावठी कोंबड्या विक्रीपासून सुरूवात केली. सध्या तो बॉयलरबरोबर गावठी कोंबड्यांची विक्री करीत आहे. कोंबड्या खरेदी-विक्रीपासूनचे सर्व व्यवहार तो सांभाळत आहे. वर्षभरात व्यवसायातील खाचखळगे त्याला कळले असून, त्याने न खचता व्यवसाय वाढविण्याचा निर्धार केला आहे. शिवाय अन्य व्यवसाय करण्याचीही त्याची तयारी सुरू असून, त्याकरिता प्रयत्नशील आहे.

सामान्य कुटुंबात जन्माला आल्याने परिस्थितीचा सामना करण्याचे बाळकडू जन्मत: प्राप्त झाले आहे. दिव्यांगत्त्वाने कुढत न बसता जमेल तसे प्रयत्न करून स्वावलंबी व्हावे, अशी धारणा आहे. सादिकभाई मला प्रेरणादायी असल्याने यापुढे माझ्यासारख्या दिव्यांगांसाठी कार्यरत राहण्याची ईच्छा आहे.- तेजस फोडकर

टॅग्स :Divyangदिव्यांगRatnagiriरत्नागिरी