शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

शाळा डिजिटल करण्याला ‘हायस्पीड’

By admin | Updated: June 24, 2016 00:43 IST

जिल्हा परिषद : खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न, गळती कमी होण्याची अपेक्षा

रत्नागिरी : खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मागे पडू नयेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलेही स्पर्धेच्या युगासाठी तयार व्हावीत, यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यावर विशेष भर दिला जात आहे. जिल्ह्यातील ३,३३३ शाळांपैकी ११५३ शाळा डिजिटल झाल्या आहेत. ७९८ शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत, तर ३५५ शाळा मोबाईल डिजिटल करण्यात आल्या आहे.इंग्रजी माध्यमांचे आकर्षण असल्यामुळेच खासगी शाळांमधील पटसंख्या वाढत असतानाच जिल्हा परिषदेच्या शाळांना मात्र गळती लागली आहे. पहिली ते चौथी तर काही ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंतच्या प्राथमिक शाळा आहेत. जिल्ह्यात १ ते ५ पटसंख्या असलेल्या १६६ तर ६ ते १० पटसंख्या असलेल्या ३०८ शाळा आहेत. कमी पटसंख्येच्या जिल्ह्यातील काही शाळा बंद करण्यात आल्या आहेत. माध्यमिक शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळा ई - लर्निंगमध्ये आघाडीवर आहेत. या शाळांमधून विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. जेणेकरून मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.शहरातील खासगी शाळांमध्ये ई - लर्निंग अध्यापन पद्धती संगणकीय प्रशिक्षण सुरु आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण मिळावे व गळती रोखावी, याकरिता डिजिटल क्लासरुम संकल्पना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून शाळा डिजिटल करण्यात येत आहेत. जिल्ह्यात चिपळूण व गुहागर तालुक्यात सर्वाधिक शाळा डिजिटल झाल्या आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचा तंत्रस्नेही व्हॉट्सअप ग्रुप तयार केला असून, याद्वारे नवनवीन तंत्रज्ञान शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांपासून गटशिक्षणाऱ्यांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. शिक्षकांसाठी असणाऱ्या सूचनादेखील याठिकाणी टाकल्या जातात. (प्रतिनिधी)मोबाईल डिजिटल स्कूल१६१ शिक्षकांनी गणित विषयाचा व्हिडिओ, १७८ शिक्षकांनी भाषेचा व्हिडिओ तर ८६ शिक्षकांनी शैक्षणिक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. टॅब व एलसीडीद्वारे डिजिटल क्लासरुममध्ये अध्यापन करण्यात येत आहे. कमी पटसंख्येच्या शाळेत टॅब, मोबाईलचा वापर केला जातो. शैक्षणिक अ‍ॅपमुळे कविता, गणित तसेच अन्य विषयांचे अध्यापन केले जाते. अ‍ॅपद्वारे प्रश्ननिर्मिती होत असल्याने मुलांना आकलन होते. विद्यार्थ्यांना एखादा विषय समजावताना उदाहरणे देण्यापेक्षा चित्रफितीमुळे चटकन समजते.काय आहे ई-लर्निंग...!वर्ग अध्यापनात आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच ‘ई-लर्निंग’. ई-लर्निंग अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना चटकन आकलन होते. जेथे ई-लर्निंग उपलब्ध आहे, अशा शाळांना डिजिटल शाळा म्हणतात. २५१ केंद्रांमध्ये डिजिटल क्लासरुम सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील १०० टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.१९२३ शाळांची प्रगती चांगलीअधिक पटसंख्या असलेल्या शाळेत एलसीडीचा वापर केला जात आहे. डिजिटल क्लासरूमध्ये प्रोजेक्टर, एलसीडी, इंटरअ‍ॅक्टीव्ह बोर्ड बसविण्यात येते. चित्र काढण्यापासून गणितांची उजळणी, गद्यपद्याचे अध्यापन करणे सोपे झाले आहे. इंटरनेटमुळे भूगोल शिकवताना विदेश सफर ‘ई लर्निंग’ मुळे घडविली जाते. ज्ञानरचना अध्यापन पद्धतीनुसार १९२३ शाळांमध्ये अध्यापन सुरु आहे.