शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

हाय रे हाय आणि कोरोनाच्या जीवात काय नाय रे... होलियो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:30 IST

रत्नागिरी : हाय रे हाय, कोरोनाच्या जीवात काय नाय रे... होलियो... अशा फाका घालत कोरोनाच्या सावटातही कोकणातील अत्यंत महत्त्वाच्या ...

रत्नागिरी : हाय रे हाय, कोरोनाच्या जीवात काय नाय रे... होलियो... अशा फाका घालत कोरोनाच्या सावटातही कोकणातील अत्यंत महत्त्वाच्या शिमग्याला उत्साहात सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात ११६७ सार्वजनिक, तर ३०७९ खासगी होळ्या उभ्या करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे अनेक निर्बंध असले तरी देवाची पालखी घरी येणार हा भाविकांचा आनंद मात्र कायम आहे.

कोकणात सध्या सर्वत्र शिमगोत्सवाची धूम सुरू झाली असली तरी कोरोनाचे सावट मात्र आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही होळी पेटविण्यात येते. शेवरीचे झाड वाजत गाजत आणून फाक पंचमीला होळी उभी केली जाते. मुख्य होळीच्या बाजुला छोटी होळी दहा दिवस पेटविण्यात येते. होळी पौर्णिमेला मात्र मोठा होम केला जातो. गणेशोत्सवाइतकाच शिमगा हाही रत्नागिरी जिल्ह्यातील मोठा सण गुरुवारपासून सुरू झाला आहे.

शिमगोत्सवात ग्रामदेवतेच्या पालख्या रूपे लावून सजविण्यात येतात. या पालख्या होळी पौर्णिमेला ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडतात, काही रंगपंचमीनंतर देवळात परतात, तर काही गावातून चैत्रीपर्यंत पालखी उत्सव साजरा केला जातो. त्याप्रमाणे जिल्ह्यातील १३७७ ग्रामदेवतांच्या पालख्या ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडणार आहेत.

कोरोनामुळे प्रशासनाने उत्सवावर अनेक निर्बंध घातले आहेत. पालखी घरोघरी जाईल की नाही, अशा शंकेने भाविक आणि मानकरी धास्तावले होते. मात्र, आता प्रशासनाने त्याला परवानगी दिली आहे आणि पालखीसोबत २५ जणांच्या उपस्थितीलाही मान्यता दिली आहे. मात्र, कोठेही पालखीची पूजा करण्याला, नारळ वाहण्याला मनाई करण्यात आली आहे.

रत्नागिरी शहर व ग्रामीण तसेच जिल्ह्यातील पोलीस स्थानकांच्या हद्दीत पेटविण्यात येणाऱ्या खासगी, सार्वजनिक होळ्यांची संख्या तसेच ग्रामप्रक्षिणेला बाहेर पडणाऱ्या पालख्यांची संख्या पुढीलप्रमाणे :

रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत १५ सार्वजनिक, तर १०७ खासगी होळ्या पेटविण्यात येणार आहेत. शिवाय १५ पालख्या ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडणार आहेत. रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत ७२ सार्वजनिक तर १३० खासगी होळ्या, ६८ पालख्या, गुहागर पोलिस स्थानकाच्या हद्दीत ४६ सार्वजनिक व २३० खासगी, ४६ पालख्या, जयगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत ४५ सार्वजनिक व १६६ खासगी, २० पालख्या, पूर्णगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत ३० सार्वजनिक, ६५ खासगी, ५५ पालख्या, राजापूरमध्ये १०४ सार्वजनिक, १४२ खासगी, ६१ पालख्या, नाटे येथे १२ सार्वजनिक व ४२ खासगी, २३ पालख्या, लांजामध्ये ९६ सार्वजनिक व ११४ खासगी, ९८ पालख्या, देवरूख येथे १२० खासगी, ११२ पालख्या, संगमेश्वर येथे ७९ सार्वजनिक, १६८ खासगी, ७९ पालख्या, चिपळूण येथे ९५, सार्वजनिक व १७० खासगी, ७२ पालख्या, सावर्डे येथे ४३ सार्वजनिक व २५० खासगी, ४० पालख्या, अलोरे येथे ३१ सार्वजनिक, ३४५ खासगी, ३१ पालख्या, खेडमध्ये २२० सार्वजनिक व ३६० खासगी, ५७१ पालख्या, दापोलीत १५० सार्वजनिक व ३७५ खासगी, दाभोळमध्ये २४ सार्वजनिक व ५७ खासगी, १८ पालख्या, मंडणगड येथे ७५ सार्वजनिक व १६५ खासगी, ५५ पालख्या, बाणकोट येथे ३० सार्वजनिक व ७३ खासगी होळ्या उभारल्या जाणार असून, १८ पालख्या ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडणार आहेत.