लांजा
: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथून कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमानी यांच्या मदतीसाठी लांजा तालुक्यातील वेरळ, लांजा, कुवे मुंबई - गोवा महामार्गावर मदत केंद्र उभारण्यात आली आहेत.
महानगरामध्ये नोकरीनिमित्त असलेली कोकणातील चाकरमानी मंडळी होळी व गणेशोत्सव सणामध्ये आपापल्या गावांमध्ये दाखल होतात. गणेशोत्सवाला मुंबई येथून कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमानी मंडळी यांना कोणतीही अडचण आल्यास तसेच मुंबई - गोवा महामार्गावरील घाटामध्ये मदत लागल्यास तातडीने मदत मिळावी. यासाठी लांजा पोलीस कार्यक्षेत्रातील वेरळ, कुवे, लांजा येथे पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. तसेच आडवली, विलवडे रेल्वे स्थानक येथेही मदत केंद्र तयार करण्यात आली आहेत. ही मदत केंद्र २४ तास चाकरमानी यांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती लांजा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी दिली आहे.