शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी आरोग्यमंत्री सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 14:37 IST

hospital, rajeshtope, ratnagiri रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी २० एकर जागा शोधून ठेवा, सगळी पूर्वतयारी करा, महाविद्यालयासाठी अध्यादेश काढायला तयार आहे. कारण ठाकरे कुटुंबाचा कोकणावर फार जीव असून, त्याला तत्काळ मान्यता मिळेल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ठळक मुद्दे २० एकर जागा शोधून ठेवा, महाविद्यालयासाठी अध्यादेश काढायला तयारठाकरे कुटुंबाचा कोकणावर जीव

रत्नागिरी : रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी २० एकर जागा शोधून ठेवा, सगळी पूर्वतयारी करा, महाविद्यालयासाठी अध्यादेश काढायला तयार आहे. कारण ठाकरे कुटुंबाचा कोकणावर फार जीव असून, त्याला तत्काळ मान्यता मिळेल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटचे रविवारी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात, तर खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अध्यादेश काढून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता मिळवली. त्याप्रमाणे रत्नागिरीतही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळू शकते, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.पालकमंत्री अनिल परब यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे रत्नागिरीत कोरोनाची वाढ रोखण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आणता आला. रत्नागिरीत गेल्या २४ तासात एकाही मृत्यूची नोंद नाही, हे या मोहिमेचेच यश असल्याचे खासदार विनायक राऊत म्हणाले.मंत्री उदय सामंत म्हणाले की, रोज ३५ ते ४० रुग्ण पॉझिटिव्ह होणाऱ्या रत्नागिरी तालुक्यासह लगतच्या मतदार संघात आता आकडा शुन्यावर आला. यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम व जिल्हा प्रशासन यांचे यश आहे, असे ते म्हणाले.यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या उपचार केंद्राबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आदिंची या कार्यक्रमास उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आभार मानले.मृत्यूदरही खाली नेऊरत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाचे चांगले काम सुरू आहे. प्लाझ्मा उपचार सुविधेतून मृत्यूदरही एक टक्क्यांच्या खाली नेऊ, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेhospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी