शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आरोग्य विभागाची करडी नजर

By admin | Updated: October 10, 2015 23:39 IST

चिपळूण पालिका : उघड्यावर शौच करणाऱ्यांना लगाम

चिपळूण : येथील नगर परिषदेला हागणदारीमुक्त पुरस्कार मिळाला असून, उघड्यावर शौचास न बसण्याबाबत कडक धोरण अवलंबण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री ८.३०च्या दरम्यान वाशिष्ठी नदीकिनारी एक तरुण शौचास बसल्याचे निदर्शनास आल्याने या तरुणाला आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चांगलीच तंबी दिली. या प्रकारावरुन रहिवाशी व कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक व धक्काबुक्की झाली. शहरातील वाशिष्ठी नदीकिनारी स्वामी समर्थनगर ही वस्ती असून, या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून शौचालयाची सुविधा नाही. त्यामुळे नदी परिसराचा शौचास बसण्यासाठी वापर केला जात होता. मात्र, चिपळूण शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने शहरातील विविध भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर आरोग्य विभागातर्फे करडी नजर ठेवण्यात आली आहे. वाशिष्ठी नदीकिनारी एक तरुण शौचास बसल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संबंधितांनी त्या तरुणास चांगलेच हटकले. हा प्रकार रहिवाशांना समजताच ते संतप्त झाले. संबंधित कर्मचारी व रहिवाशी यांच्यात शाब्दिक चकमक व धक्काबुक्की झाली. या प्रकरणी आरोग्य विभागाचे कर्मचारी रमेश बुरटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार रज्जाक सय्यद (३४ रा. गोवळकोट रोड), मल्लिक सय्यद (१९ रा. पेठमाप) यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. झालेल्या प्रकाराबाबत शनिवारी अंदाजे १०० ते १२५ रहिवाशांनी नगर परिषदेवर धडक दिली. चिपळूण पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते राजेश कदम, आरोग्य समितीच्या सभापती रुक्सार अलवी, बांधकाम सभापती बरकत वांगडे यांची भेट घेऊन कर्मचाऱ्याकडून झालेल्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, आम्हाला शौचालय नसल्याने आम्ही काय करायचे? असा सवालही यावेळी रहिवाशांनी केला. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम यांनीही येथे भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. स्वामी समर्थनगर येथे थोड्या दिवसातच शौचालय बांधण्याबाबत नगर परिषद प्रशासनाने सहमती दर्शवली आहे. शहराचे नाव बदनाम होईल असे कृत्य करु नये अशी सूचनाही गटनेते राजेश कदम यांनी रहिवाशांना केली. (वार्ताहर)