शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दु:ख बाजूला सारून त्याने केले भावाचे नेत्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:51 IST

अरुण आडिवरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ऐन तारुण्यात २७व्या वर्षी लोटे (ता. खेड) येथील प्राजक्त रविकिरण देवरुखकर याचे लोटे येथील रघुवीर घाटातील धबधब्यात पडून निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे भाऊ रणजीत रविकिरण देवरुखकर यांनी स्वत:चे दु:ख बाजूला ठेवत सामाजिक जाणीव जपत भावाचे नेत्रदान करुन एक आदर्श घडविला आहे.प्राजक्त हा दि. ...

अरुण आडिवरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ऐन तारुण्यात २७व्या वर्षी लोटे (ता. खेड) येथील प्राजक्त रविकिरण देवरुखकर याचे लोटे येथील रघुवीर घाटातील धबधब्यात पडून निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे भाऊ रणजीत रविकिरण देवरुखकर यांनी स्वत:चे दु:ख बाजूला ठेवत सामाजिक जाणीव जपत भावाचे नेत्रदान करुन एक आदर्श घडविला आहे.प्राजक्त हा दि. १३ जुलै रोजी धबधब्यावर फिरायला गेला असता तेथे त्याचा अपघात झाला. डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याला कोल्हापूर येथे रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु त्याचा मृत्यू झाला. आपल्या लहान भावाच्या मृत्यूच्या दु:खात असूनही रणजीत देवरुखकर यांनी त्याचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.सह्याद्री निसर्ग मित्रचे उदय पंडित, डॉ. ग. ल. जोशी, भाऊ काटदरे यांनी घरडा हॉस्पिटल, लोटे येथे जाऊन प्राजक्त देवरुखकर यांचे नेत्र (कॉर्निया) पंधरा ते वीस मिनिटात काढले. त्यानंतर खास एम. के. मिडीयम या औषधातून व विशेष बनवलेल्या अतिथंड बॉक्समधून त्वरित सांगली येथील दृष्टीदान आय बँक, डॉ. मिलिंद किल्लेदार यांच्याकडे पाठवले. सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण डॉ. ग. ल. जोशी व इतर सर्व नेत्रतज्ज्ञांनी सुरू केलेल्या चळवळीला चालना मिळतआहे.चिपळूणमधील सह्याद्री निसर्ग मित्रच्यावतीने नेत्रदान चळवळ सुरू करण्यात आली आहे. वर्षभरात ११ यशस्वी नेत्रदान झाली असल्याची माहिती ‘सह्याद्री निसर्ग मित्र’चे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी दिली.जगात २० टक्के अंध भारतातजगातील ३ कोटी ९० लाख अंध व्यक्तींपैकी २० टक्के म्हणजे ७ लाख ८० हजार अंध भारतात आहेत. त्यातील ६० टक्के मोती बिंदुमुळे, तर २ टक्के कॉर्नियाच्या खराब होण्यामुळे आहे. त्यामध्ये दरवर्षी ४० ते ५० हजाराची भर पडत असते. या १,५६,००० अंधांना जर नेत्रदानापासून कॉर्निया उपलब्ध झाला तर त्यांच्या जीवनातील अंधकार दूर होऊ शकतो.कॉर्निया काढला जातोनेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर माणसाच्या डोळ्यामधील काळ्या बुबुळाची वरची १/२ मिलिमीटर जाडीची चकती (कॉर्निया) काढून ती अंध व्यक्तीला बसवणे, नेत्रदानात संपूर्ण डोळा काढला जात नाही. हे मृत्यूनंतर ६ तासात करणे आवश्यक असते. मृत व्यक्तीची संमती घेतली नसली तरी केवळ नातेवाईकांच्या संमतीने नेत्रदान करता येते.