शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा

By admin | Updated: September 4, 2016 00:43 IST

नंदकिशोर जकातदार : ज्योतिष अभ्यास मंडळाचा रत्नागिरीत पदवीदान समारंभ

रत्नागिरी : ज्योतिषशास्त्र हे पूर्वापार चालत आलेले राजमान्य शास्त्र आहे. त्यामुळे ज्योतिषांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून समाजाला जागरूक करावे, असे प्रतिपादन पुण्याच्या वराहमिहीर ज्योतिष मुक्त विद्यापीठाचे कुलपती ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार यांनी येथे केले.श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ व पुण्यातील वराहमिहीर ज्योतिष मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे नुकताच पदवीदान समारंभ व व्याख्यानमाला झाली, त्यावेळी ते बोलत होते. जयेश मंगल पार्क येथे हा कार्यक्रम झाला.यावेळी साई अनिरुद्ध सोसायटीच्या कार्याध्यक्षा जया सामंत म्हणाल्या की, स्पर्धेच्या युगामुळे प्रत्येकावर ताणतणाव आहे. त्यामुळे आपली आपणच काळजी घेतली पाहिजे. तसेच प्रत्येकाने स्वत:साठी १५-२० मिनिटे दिली पाहिजेत. त्यासाठी वेळ काढून योगासने, ध्यानधारणा करा, एकाग्र व्हा, आपली ऊर्जा आपणच तयार केली पाहिजे, आयुष्याकडे सकारत्मकतेने बघायला शिका, ज्योतिष हे महत्त्वाचे शास्त्र आहे, त्याचा करावा तेवढा अभ्यास थोडाच आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले तुळजापूरच्या महाशक्तीपीठाचे डॉ. रंगनाथ नाथराव जोशी यांचेही व्याख्यान झाले. ते म्हणाले की, समाजव्यवस्था बदलण्याची ताकद ज्योतिष विषयात आहे. त्यातून सत्यम, शिवम, सुंदरम असे चित्र निर्माण होईल. यावेळी मंदरूळ (राजापूर) येथील सुनंदा विनायक नेवरे यांना कार्यगौरव पुरस्कार म्हणून प्रशस्तीपत्र व ५ हजार रुपये देण्यात आले. गतिमंद मुलांसाठी कार्यरत ‘आशादीप’ संस्थेला अर्थसहाय्य करण्यात आले. यावेळी झालेल्या व्याख्यानमालेत पुण्याच्या अ‍ॅड. मालती शर्मा यांचे वैवाहिक जीवनाची यशस्विता, सातारचे डॉ. विकास खिलारे यांचे शनिचे महत्त्व, नाशिकचे श्रीनिवास रामदास यांचे २१ व्या शतकात कर्जाचे महत्व व पुण्याचे सतीश मुंडलिक यांचे आधुनिक वास्तुशास्त्रवर व्याख्यान झाले. प्रसन्न मुळ्ये यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रेवती मेहेंदळे यांनी केले तर मधुरा चिंंचळकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)