शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

नाणारमधील प्रकल्प विरोधातील गुन्हे मागे घेताच जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 16:28 IST

नाणार प्रकल्प विरोधकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर प्रकल्प परिसरातील जनतेने सागवे येथे मंगळवारी जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यात आले.

ठळक मुद्देनाणारमधील प्रकल्प विरोधातील गुन्हे मागे घेताच जल्लोष फटाक्यांची आतषबाजी, उद्धव ठाकरे यांचे आभार

राजापूर : नाणार प्रकल्प विरोधकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर प्रकल्प परिसरातील जनतेने सागवे येथे मंगळवारी जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यात आले.शिवसेना सदैव प्रकल्प विरोधकांच्या साथीने उभी राहिली. यामध्ये शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सर्व आंदोलनात सहभागी झाली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सागवे येथे येऊन प्रकल्प रद्द करू असा शब्द दिला होता. त्यानंतर शासनाला प्रकल्प रद्द करायला भाग पाडले होते. महाराष्ट्र विकास आघाडीची राज्यात सत्ता येताच प्रकल्पविरोधकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हे गुन्हे मागे घेतले जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर प्रकल्पग्रस्त परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला .मंगळवारी सकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, सभापती अभिजीत तेली, माजी सभापती व शेतकरी, मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष कमलाकर कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, राजेंद्र कुवळेकर यासहित शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर कोकण शक्तीचे अध्यक्ष अशोक वालम, मच्छीमार नेते मज्जीद भाटकर, भूमीकन्या एकता मंचच्या नेहा दुसणकर यासहित अनेक प्रकल्पविरोधक सागवे येथे जमले होते.सागवे परिसरात जमलेल्या प्रकल्पग्रस्तांनी एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला. त्यावेळी ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या नेहमीच बाजूने राहिली व अखेर शिवसेनेमुळेच प्रकल्प रद्दही झाला आणि आता शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांमुळे आंदोलकांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRatnagiriरत्नागिरी