शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात सभापती राष्ट्रवादीचाच होणार

By admin | Updated: March 13, 2017 22:57 IST

गुहागरात सभापती राष्ट्रवादीचाच होणार

गुहागर : गुहागर पंचायत समितीच्या निवडणुकीत आठपैकी पाच सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आल्याने सभापती राष्ट्रवादीचाच होणार हे निश्चित आहे. महिला सर्वसाधारण राखीव सभापती पदासाठी कोतळूक गणातून दुसऱ्या टर्ममध्ये निवडून आलेल्या पूनम पाष्टे या पालपेणे गणातून निवडून आल्या आहेत, तसेच यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या विभावरी मुळे यापैकी आमदार भास्कर जाधव कोणाला संधी देतात, याबाबत राजकीय गोटात उत्सुकता आहे. पूनम पाष्टे या कोतळूक गणातून दुसऱ्या वेळी विजयी झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी तालुक्यात कुणबी फॅक्टरची जोरदार चर्चा होती. कुणबी समाज पातळीवर मोठ्या प्रमाणात चाललेल्या राजकीय हालचालीची दखल भास्कर जाधव यांनीही अंतर्गत पातळीवर घेतली होती. यापूर्वी तवसाळ गटातून जिल्हा परिषद सदस्य असणारे व कुणबी समाजप्रमुख रामचंद्र हुमणे यांना योवळी मोठा पराभव पत्करावा लागला. पंचायत समिती सदस्यांमध्ये पूनम पाष्टे व्यतिरिक्त वेळणेश्वर गणातून निवडून आलेले ठोंबरे यांचा समावेश आहे. यापूर्वी विलास वाघे, राजेश बेंडल यांना सभापती पदाची संधी मिळाली होती. बेेंडल व आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण होत आहे. पंचायत समिती निवडणुकीमध्ये राजेश बेंडल यांनी अलिप्त राहाणे पसंत केले. भास्कर जाधव यांनी सर्व स्तरातील सदस्यांना नेतृत्व द्यायचे धोरण आतापर्यंत कायम ठेवले आहे. आगामी काळाचा विचार करता मागील टर्मचा अनुभव असणाऱ्या पूनम पाष्टे यांना पहिली पसंती मिळू शकते. भास्कर जाधव यांचे सर्वांत निकटवर्तीय असणारे विनायक मुळे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी कार्यरत आहेत. मागील टर्मममध्ये जिल्हा परिषद म्हणून त्यांच्या पत्नी विभावरी मुळे यांनी काम पाहिले आहे. पालपेणे गणातून विजयी झाल्याने मुळे या सभापती पदाच्या दावेदार आहेत. गुहागर शहरात स्नेहा वरंडे नगराध्यक्ष, तर गुहागर शहर अध्यक्ष म्हणून त्यांचे पती संतोष वरंडे काम पाहात आहेत. आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तालुक्यात घराणेशाहीची कुरबुरी चर्चेत होती. अशावेळी विभावरी मुळे यांना सभापतीपद दिल्यास याबाबतच्या चर्चेला उधाण येऊन घराणेशाहीचा संदेश जाऊ शकतो. (प्रतिनिधी)