शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुहागर नगरपंचायतीच्या वेबसाईटचा खर्च मुख्याधिकाऱ्यांवर

By admin | Updated: April 1, 2017 12:36 IST

माजी नगरसेवक मयुरेश कचरेकर यांचा आरोप

आॅनलाईन लोकमतगुहागर दि. १ : गुहागर नगरपंचायतीच्या वेबसाईटचे काम पूर्ण होण्याअगोदरच २ लाख ८७ हजार रुपये खर्ची टाकल्याने मुख्याधिकारी यांच्याकडे आपण खुलासा मागितला असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. मात्र, वेबसाईट खर्चातील भ्रष्टाचारप्रकरण मुख्याधिकाऱ्यांवर ढकलून यातून स्वत:ला सुरक्षित करण्याचा प्रयत्न नगराध्यक्षांनी केल्याचा आरोप माजी नगरसेवक मयुरेश कचरेकर यांनी केला. वेबसाईट प्रकरणात भ्रष्टाचार झाला, हे आता सर्वांना माहीत आहे. मात्र, त्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलून जनतेची दिशाभूल केली जात आहे.

गुहागर नगरपंचायतीची वेबसाईट बनवण्यासाठी अंदाजपत्रक बनवले नव्हते. तसेच वेबसाईटचे काम पूर्ण होण्याअगोदर तब्बल २ लाख ८७ हजारांचे देयक पुण्यातील अ‍ॅबेल इलेक्ट्रोसॉफ्ट प्रा. लि. या कंपनीला देऊन यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कचरेकर यांनी नगराध्यक्षांना दिलेल्या पत्राद्वारे केला होता. आपण दिलेल्या पत्राचे मला दिलेले उत्तर दिशाभूल करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वेबसाईटच्या खर्चाला सर्वसाधारण सभेत मंजुरी घेणे आवश्यक होते. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून पारदर्शक कारभार करणे गरजेचे होते. असे असताना त्या वेबसाईटमधून आपल्याला काय मिळणार आहे, त्याचे नक्की स्वरुप कसे आहे, त्यासाठी येणारा खर्च किती, याचे कोणतेही अंदाजपत्रक बनवले गेले नाही. त्यासाठी कोणतेही नियोजन गुहागर नगरपंचायतीने केले नाही. आजही वेबसाईट दिसत नाही. त्यामुळे आपण केलेल्या भ्रष्टाचाराला बगल देण्याचे काम केले गेले आहे, असे मयुरेश कचरेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)