लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : मुंबई येथे दि. ९ आॅगस्ट रोजी होणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या प्रचार व प्रसारासाठी रत्नागिरी शहरातून दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले होते. माळनाका येथील मराठा भवन येथून दुचाकी फेरीला प्रारंभ झाला.मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी नुकतेच शहरातील मराठा भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी दुचाकी फेरीचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. मुंबईतील मोर्चासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मराठा बंधु-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यासंदर्भातही नियोजन करण्यात आले.मराठा भवन येथून सुरू झालेली फेरी मारूती मंदिर येथे आल्यानंतर मराठा बांधवांतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ही रॅली कुवारबाव, रेल्वेस्टेशन, आरटीओ कार्यालय, साईनगर, शांतीनगर, नाचणे, मारूती मंदिर, आठवडा बाजारमार्गे मराठा भवन येथे आल्यानंतर सांगता झाली.
मराठा मोर्चासाठी भव्य रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:55 IST