शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

ग्रामसेवकांचे दोन महिन्यांचे पगार रखडले, असहकार आंदोलन सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:24 IST

कोणतीही पुर्वसूचना न देता ग्रामसेवकांचे गेल्या दोन महिन्यांचे पगार अदा करण्यात आलेले नाहीत. यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना शाखा, संगमेश्वरने पंचायत समिती प्रशासनाशी असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून ५ रोजी ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीमध्ये ग्रामसेवकांनी आढावा देण्याचे नाकारून आपले आंदोलन सुरू ठेवले.

ठळक मुद्दे ग्रामसेवकांचे दोन महिन्यांचे पगार रखडले, असहकार आंदोलन सुरुआढावा बैठकीत माहितीच दिली नाही

देवरूख : कोणतीही पुर्वसूचना न देता ग्रामसेवकांचे गेल्या दोन महिन्यांचे पगार अदा करण्यात आलेले नाहीत. यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना शाखा, संगमेश्वरने पंचायत समिती प्रशासनाशी असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून ५ रोजी ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीमध्ये ग्रामसेवकांनी आढावा देण्याचे नाकारून आपले आंदोलन सुरू ठेवले.पंचायत समितीच्या आढावा बैठकीला कोणताही आढावा, कोणत्याही नोंदी देण्यात येऊ नयेत, असे आदेश जिल्हा संघटनेकडून संगमेश्वर तालुका संघटनेला मिळाले होते. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी मंगळवारी बोलावलेल्या ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीत ग्रामसेवकांनी आढावा देण्यास नकार दिला. त्यामुळे ही आढावा बैठक होऊ शकली नाही.ग्रामसेवकांना गेल्या दोन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनांनी आंदोलनाची भूमिका स्वीकारली आहे. मात्र, ही आंदोलनाची भूमिका घेताना ग्रामस्तरावरील काम सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. ग्रामीण भागातील कोणाचीही अडचण होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे ग्रामसेवकांनी नमूद केले.मात्र, पंचायत समिती प्रशासनाशी असहकार ठेवल्यामुळे घरकुलांना मंजुरी, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीची कामे, जनसुविधेंतर्गत असलेली कामे, २५-१५ टक्के योजनेंतर्गत कामे आदी कामांच्या मंजुरीबाबत आणि त्यांच्या अंमलबजावणीला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आचारसंहितेपूर्वी विकासकामांना मंजुरी व त्याची अमलबजावणी होणे क्रमप्राप्त बनले आहे. मात्र, ग्रामसेवक संघटनांनी पंचायत समिती, तालुका प्रशासनाला कोणतीच माहिती द्यावयाची नाही, अशी भूमिका स्वीकारल्याने मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या असहकार आंदोलनाचा तिढा सोडवणे गरजेचे बनले आहे.

अन्यथा विकासकामांवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नसल्याचे मत ग्रामसेवक संघटना शाखा, संगमेश्वरचे अध्यक्ष ई. डी. करंबेळे, उपाध्यक्ष विजय पाटील, सचिव शेखर जाधव, खजिनदार मेघा सुवारे, जिल्हा संघटक सुहास शिंदे, राज्य कोकण विभाग अध्यक्ष एन. एस. पवार आदी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. आपला पगार तत्काळ न झाल्यास हे आंदोलन उग्ररूप धारण करेल, असा गर्भित इशारा प्रशासनाला दिला आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरी