शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत उपक्रमाचे कौतुक, जिद्दी, रत्नदुर्ग माऊंटेनिअर्समुळे गोविंदा सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 15:50 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दहीहंडीत सहभागी होणाऱ्या सर्वांत वरच्या थरातील गोविंदाला बॉडी हार्नेस, हेल्मेट आणि रोपच्या सहाय्याने सुरक्षितता प्रदान करण्याची जबाबदारी गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स तसेच जिद्दी माऊंटेनिअरिंग या दोन संस्थांनी हाती घेतली होती. ती यशस्वीही करून दाखविली.

ठळक मुद्देरत्नागिरीत उपक्रमाचे कौतुक, जिद्दी, रत्नदुर्ग माऊंटेनिअर्समुळे गोविंदा सुरक्षितसुरक्षेसह संरक्षणासाठी प्रयत्न : साहसी खेळाचे नाव दिल्याने गोविंदांमध्ये उत्साह अधिक

रत्नागिरी : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दहीहंडीत सहभागी होणाऱ्या सर्वांत वरच्या थरातील गोविंदाला बॉडी हार्नेस, हेल्मेट आणि रोपच्या सहाय्याने सुरक्षितता प्रदान करण्याची जबाबदारी गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स तसेच जिद्दी माऊंटेनिअरिंग या दोन संस्थांनी हाती घेतली होती. ती यशस्वीही करून दाखविली.कोकणात दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदांना गिर्यारोहणाच्या साधन सामग्री अर्थात बॉडी हार्नेस, हेल्मेट आणि रोपच्या सहाय्याने प्रथमच १०० टक्के सुरक्षा व संरक्षण देण्याचा प्रयत्न जिद्दी तसेच रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या कार्यकर्त्यांनी केला.

न्यायालयाने दहीहंडी उत्सवाला जे साहसी खेळाचे नाव दिले आहे, त्या गोष्टीचं तंतोतंत पालन करत या संस्थांनी गोविंदाना सुरक्षा प्रदान केली. पाचपेक्षा अधिक थर असलेल्या ठिकाणी वरच्या थरावर असलेल्या गोविंदासाठी ही सुरक्षितता असल्याने दहीहंडीचा आनंद अधिक द्विगुणित झाला.आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत सोमवारी शहरातील मांडवी समुद्रकिनाऱ्यावर शिवसेना पुरस्कृत श्री प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमात जिद्दीची पूर्ण टीम आलेल्या सर्व वरच्या थरावर चढणाऱ्या गोविंदांना योग्य त्या प्रकारे संरक्षण देण्यासाठी पूर्णपणे यशस्वी झाली. या ठिकाणी पाच थरावर हंडी बांधण्यात आली होती. गोविंदाना सुरक्षा कवच मिळाल्याने येथील दहीहंडी अतिशय जोशपूर्ण वातावरणात पार पडली.तसेच साळवी स्टॉप येथील रत्नागिरी जिल्हा मोटार मालक असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमातही जबाबदारी रत्नदुर्ग टीमने पार पाडली. येथील दहीहंडीत सहभागी होणाऱ्या सर्वांत वरच्या थरातील गोविंदाला ह्यबॉडी हार्नेसह्ण, हेल्मेट आणि रोपच्या सहाय्याने सुरक्षित केल्याने गोविंदानी अधिक उत्साहाने भाग घेतला.गोविंदांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्नअनेक ठिकाणी उंचावरील दहीहंडी फोडणाऱ्या गोविंद पथकांना लाखो रूपयांचे बक्षीस लावले जाते. बक्षिसाच्या आकर्षणापोटी अनेक गोविंदा धोका पत्करून हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, काही वेळा त्यांना जीवघेणा अपघात घडतो. अनेक गोविंदा यात जायबंदी झालेले आहेत. या कार्यक्रमाचा आनंद टिकून राहावा, तसेच वरच्या थरावरील गोविंदाला सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

टॅग्स :Dahi Handiदही हंडीRatnagiriरत्नागिरी