शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कोविड रूग्णालयांसाठी सरकारी दरपत्रक जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 13:01 IST

कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी खासगी कोविड रुग्णालयांसाठी शासनमान्य दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता या रुग्णालयांवर प्रशासनाच्या त्रिसदस्यीय समितीचे नियंत्रण राहणार असल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देखासगी कोरोना रूग्णालयांसाठी सरकारी दरपत्रक जारीसामान्य नागरिकांना मिळणार दिलासा

रत्नागिरी : कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी खासगी कोविड रुग्णालयांसाठी शासनमान्य दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता या रुग्णालयांवर प्रशासनाच्या त्रिसदस्यीय समितीचे नियंत्रण राहणार असल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमधील सुविधा अपुऱ्या पडत आहेत. तसेच डॉक्टर, परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने आरोग्य सेवा देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सध्या काही खासगी डॉक्टरांचे तसेच खासगी रुग्णालयांचे सहकार्य घेण्यात येत आहे. रुग्णसंख्या भरमसाठ वाढू लागल्याने अत्यावश्यक सुविधा उपलब्ध असलेली काही खासगी रुग्णालये अधिग्रहीत करण्यात आली आहेत.मात्र, काही ठिकाणी कोरोना रुग्णांकडून दामदुप्पट बिल घेतले जात असल्याच्या तक्रारी दाखल येऊ लागल्या आहेत. याचे कारण देताना काही खासगी डॉक्टर किंवा रुग्णालये याबाबत शासनाचे दरपत्रक निश्चित झाले नसल्याचे सांगत पळवाट शोधू लागले होते.

यामुळे रुग्ण आणि खासगी डॉक्टर अथवा रुग्णालये यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण होऊ लागले होते. अखेर या बाबीची दखल घेत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टर किंवा रुग्णालये यांच्यासाठी शासनमान्य दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे.या दरपत्रकाची अंमलबजावणी होते किंवा नाही, हे पाहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती अशा खासगी रुग्णालयांची नियमित तपासणी करणार असून, या शासनमान्य दरपत्रकानुसार बिलाची आकारणी केली जाते आहे किंवा नाही, यावर लक्ष ठेवणार आहे.

त्यामुळे आता अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. भरमसाठ बिल घेत असल्याचे निदर्शनास आल्यास रुग्णांनाही तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार दाखल करता येणार आहे.समावेश असलेल्या बाबी...रूग्णाची नियमित देखभाल, रक्त व लघवी तपासणी, सोनोग्राफी, टू डी इको, एक्सरे, इ. सी. जी. आदी तपासण्या, मर्यादित किरकोळ औषधे, डॉक्टर्स तपासणी, रूग्णबेड चार्जेस, नर्सिंग चार्जेस, जेवण, छोटे उपचार (उदा. नाकातून नळी टाकणे, कॅथेटरचा वापर)असे आहेत एका दिवसाचे दर...

  • सामान्य कक्ष (जनरल वॉर्ड) तसेच विलगीकरण - ४००० रूपये
  • अतिदक्षता विभाग(आय. सी. यु.) व्हेंटीलेटरशिवाय तसेच विलगीकरण ७५०० रूपये
  • अतिदक्षता विभाग(आय. सी. यु.) व्हेंटीलेटरसह तसेच विलगीकरण ९००० रूपये
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्ग