शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

शिक्षक वेतनाबाबत शासन गंभीर नाही

By admin | Updated: April 10, 2015 00:38 IST

कपिल पाटील : भरणे येथे जिल्हा भारतीच्या शिक्षक मेळाव्यात मार्गदर्शन

खेड : राज्य सरकार शैैक्षणिक गुणवत्तेच्या नावाने नेहमी बोंब करत असते. त्याकरिता लाखो आणि करोडो रूपयांच्या जाहिराती देऊन शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणावर जोर देते. मात्र, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याची ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे, त्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन आणि इतर प्रश्नावंर सरकार अद्याप गंभीर नाही, असा आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे.भरणे येथील नवभारत हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा भारतीच्या शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिक्षक भारतीचे राज्याचे अध्यक्ष अशोक बेलसरे उपस्थित होते़ यावेळी खेड आणि दापोली तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली़ योग्य निर्णय न घेतल्याबाबत त्यांना दोषी ठरविले. गेली अनेक वर्षे विना अनुदानित शाळांच्या अनुदान प्राप्तकरिता झगडत आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून हे प्रयत्न करत असून, याला म्हणावे तसे यश प्राप्त झालेले नाही. मात्र, ज्या शाळांना अनुदान प्राप्त ठरवण्यात आले आहे, अशा शाळांना हे अनुदान मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रकाश लाड, सदाशिव सावंत, शंकर जगदाळे यांना मुख्याध्यापक तर धनाजी पाटील यांना उपमुख्याध्यापकपदी बढती मिळाल्याबददल त्यांचा सत्कार करण्यात आला. खेडचे आमदार संजय कदम यांनी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळांची तसेच शिक्षकांची अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावल्याचे सांगितले.यावेळी जामगे येथील छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल आणि भडगाव येथील ज्ञानदीप विद्यामंदिर तसेच नवभारत हायस्कूल या प्रशालांना उपक्रमशील शाळा पुरस्कार आमदार संजय कदम यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अनेक शिक्षणप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)