शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दक्षिण रत्नागिरी युवा महोत्सवात गोगटे महाविद्यालयाला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 13:35 IST

मुंबई विद्यापीठाचा ५१वा आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव राजेंद्र माने इंजिनियरिंग महाविद्यालय, आंबव (देवरुख) येथे विविध कलाप्रकारांनी रंगला.

ठळक मुद्देदेवरूखमधील आंबव महाविद्यालयात रंगला कार्यक्रम चार तालुक्यातील १५ महाविद्यालयांचा सहभाग

देवरूख : मुंबई विद्यापीठाचा ५१वा आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव राजेंद्र माने इंजिनियरिंग महाविद्यालय, आंबव (देवरुख) येथे विविध कलाप्रकारांनी रंगला. या महोत्सवात सादर झालेल्या ३२ कलाप्रकारांमध्ये रत्नागिरीतील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाने ५४ गुणांसह दक्षिण झोनचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या महोत्सवात आठल्ये-सप्रे महाविद्यालय ३६ गुण, नवनिर्माण महाविद्यालय १७ गुण, फिनोलेक्स महाविद्यालय १६ गुण, राजेंद्र माने महाविद्यालय १४ गुण, भारत शिक्षण महाविद्यालय ९ गुण प्राप्त झाले आहेत.महोत्सवाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष माजी राज्यमंत्री रवीद्र माने यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्षा नेहा माने, जान्हवी माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. नीलेश सावे, शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे माजी संचालक डॉ. प्रमोद पाबरेकर, समन्वयक प्रा. आनंद आंबेकर, सहसमन्वयक प्रा. राहुल कोतवडेकर उपस्थित होते.महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. सावे म्हणाले की, हा युवा महोत्सव एखाद्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथमच होत आहे. अशाप्रकारचे उपक्रम हे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी व जीवन जगण्याची कला शिकवणारे असतात. आंबव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी अशा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे सांगतानाच यातून मोठे कलाकार निर्माण होतात, असे सांगितले.रवींद्र माने यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, अशा युवा महोत्सवातून नवा जोश मिळतो तसेच यशापयशाची चवही कळते आणि त्यातून सहभागी विद्यार्थ्यांना नवा धडा मिळतो. यावेळी त्यांनी सहभागी संघांना सुयश मिळावे, अशी सदिच्छा दिली. युवा महोत्सवाचे महाविद्यालय समन्वयक प्रा. गणेश जागुष्टे यांनी उपस्थितांचे आभार मानले.गोगटे महाविद्यालयाला १५ पारितोषिकरत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमाकांची दहा, द्वितीय क्रमांकाची तीन तसेच तृतीय व उत्तेजनार्थ प्रत्येकी एक अशा एकूण पंधरा पारितोषिकांसह या युथ फेस्टिवलमध्ये आपला ठसा उमटवला.

देवरूखच्या आठल्ये-सप्रे महाविद्यालयाने प्रथम क्रमाकांची सात, द्वितीय क्रमांकाची दोन तसेच तृतीय व उत्तेजनार्थ प्रत्येकी एक अशी एकूण बारा पारितोषिके मिळवली. भारत शिक्षण मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रत्नागिरी, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय, रत्नागिरी तसेच फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी यांनीही प्रत्येकी सहा पारितोषिके मिळवली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकRatnagiriरत्नागिरी