रत्नागिरी : येथील अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींच्या संघाची राज्यस्तरीय खो - खो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.सांगली येथे झालेल्या १९ वर्षांखालील कोल्हापूर विभागीय खो-खो स्पर्धेमध्ये मुलींच्या संघाने कोल्हापूर संघावर मात करून विजय संपादन केला. संघातील तन्वी कांबळे, ऐश्वर्या सावंत, श्रध्दा लाड, दिव्या भोरे, रेणुका मोहिते यांनी उत्कृष्ठ खेळ सादर केला. त्यांच्या अष्टपैलू खेळामुळेच कोल्हापूर संघावर मात करणे शक्य झाले. या विजयाबरोबरच रत्नागिरी संघाची निवड राज्यस्तरीय खो - खो स्पर्धेसाठी झाली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य डॉ. श्रीकृष्ण जोशी, क्रीडाशिक्षक चंद्रकांत घवाळी, लीना घाडीगावकर यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)
मुलींचा खो - खो संघ राज्यस्तरावर
By admin | Updated: November 11, 2015 23:35 IST