शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाइन दिनासाठी गिफ्टशॉपी सजल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 16:06 IST

Valentine Day Ratnagiri- प्रेमाचा दिन म्हणून दि.१४ फेब्रुवारी व्हॅलेंटाइन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील गिफ्टशॉपी सजल्या आहेत. गुलाबी, लाल रंगाचे पिलो, फुले, भेटवस्तू, शिवाय चॉकलेट्स विक्रीस आली आहेत.

ठळक मुद्दे व्हॅलेंटाइन दिनासाठी गिफ्टशॉपी सजल्या खास व्हॅलेंटाइन दिवशी इच्छुकांचे लग्नसोहळे

रत्नागिरी : प्रेमाचा दिन म्हणून दि.१४ फेब्रुवारी व्हॅलेंटाइन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील गिफ्टशॉपी सजल्या आहेत. गुलाबी, लाल रंगाचे पिलो, फुले, भेटवस्तू, शिवाय चॉकलेट्स विक्रीस आली आहेत.प्रेमाचा दिन साजरा करीत असताना, या दिवशी युवक, युवती आपल्या प्रेमींना भेट देतात, शिवाय पतीपत्नीही एकमेकांना भेटी देत असतात. परगावी राहणाऱ्यांसाठी प्रेमाचे संदेश देण्याकरिता भेटकार्डही उपलब्ध आहेत. २० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंतची ग्रिटींग्ज कार्ड बाजारात उपलब्ध आहेत. हार्टशेप पिलो, लिपशेप पिलोही विक्रीस उपलब्ध आहेत. प्रेमाची अभिव्यक्ती करण्यासाठी गुलाबी, लाल रंगाचे वेलवेटचे छोट्या मोठ्या आकारातील पिलो एकमेकांना देण्यात येतात. २५० रुपयांपासून २,५०० रुपयांपर्यंत पिलोच्या किमती आकारानुसार सांगण्यात येत आहेत.गिफ्टशॉपीच्या बाहेर अडकविण्यात आलेले पिलो ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत, याशिवाय अन्य भेटवस्तूही विक्रीस उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे, कृत्रिम गुलाबाची फुले शिवाय गुलाबाच्या फुलांमध्ये अंगठीची डबी असलेली फुले यांनाही मागणी होत आहे. त्याचप्रमाणे, विविध कंपन्यांची चॉकलेट्स बाजारात विक्रीस आली आली आहेत. चॉकलेट्सच्या गिफ्ट पॅकिंग्जना अधिक मागणी होत आहे.खास लग्नसोहळे

दि.१४ फेब्रुवारीला लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे इच्छुकांनी लग्नसोहळे खास व्हॅलेंटाइन दिवशी आयोजित केले आहेत. मात्र, त्यासाठी सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पालकांनीही परवानगी देत नियोजन केले आहे

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेRatnagiriरत्नागिरी