राजापूर : तालुक्यातील धारतळे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, दक्षिण रत्नागिरीच्या वतीने सेवाभावी वृत्तीने रुग्णांना मदत व्हावी, या हेतूने पाच इलेक्ट्रिक गिझर भेट देण्यात आले.
प्रांत कार्यालय, राजापूर येथील नायब तहसीलदार दीपाली पंडित यांनी केलेल्या आवाहनानुसार ही भेट प्रदान करण्यात आली. राजापूर तालुका आरोग्याधिकारी डॉ. निखिल परांजपे यांच्याकडे सदर गिझर देण्यात आला़ त्यावेळी जनकल्याण समिती जिल्हा दक्षिण रत्नागिरी शिक्षण आयाम प्रमुख राजन गोठणकर, रा. स्व. संघ राजापूर तालुका संपर्कप्रमुख संदीप देशपांडे, राष्ट्रीय सेवा समिती दक्षिण रत्नागिरी कोषाध्यक्ष ॲड. प्रशांत पाध्ये, जनकल्याण समिती रुग्णोपयोगी साहित्य केंद्र, राजापूर प्रकल्प प्रमुख रमेश गुणे यांच्यासह जनकल्याण समितीचे अनंत रानडे, विशाल मोरे, संघ स्वयंसेवक सुशांत पवार, सूरज पेडणेकर, विवेक गुण्ये, कर्मचारी सुशांत बाकाळकर उपस्थित होते. तालुका आरोग्याधिकारी डॉ. निखिल परांजपे यांनी आभार मानले.