शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
3
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
4
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
5
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
6
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
8
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
9
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
10
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
11
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
12
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
13
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
14
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
15
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
16
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
17
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
18
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
19
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
20
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल

कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाला गती मिळावी !

By admin | Updated: December 1, 2015 00:11 IST

नाना खामकर, प्रशांत यादव यांची मागणी

कऱ्हाड : ‘बारामती लोहमार्गाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातल्यामुळे काम लवकरच सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे कऱ्हाड-चिपळूण लोहमार्गाच्या कामात लक्ष घातल्यास या कामाला गती मिळेल,’ अशी मागणी येथील नाना खामकर व प्रशांत यादव यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना केली. पश्चिम महाराष्ट्र व कोकणच्या विकासासाठी कऱ्हाड-चिपळूण लोहमार्ग हा महत्त्वाचा आहे. कोकण परिसरातील बंदराद्वारे होणारी आयात निर्यात व मालवाहतूक या लोहमार्गामुळे सुलभ होणार आहे. सध्या कोकण परिसरात कोळशावर आधारित वीजप्रकल्पांना आवश्यक असणारा कोळसा परदेशातून जहाजांद्वारे आणावा लागतो. तसेच धान्य, साखर व खते आदींचीही निर्यात त्या माध्यमातून होते; परंतु लोहमार्गामुळे ही वाहतूक सुलभ होऊन रोजगारनिर्मिती होणार आहे. त्याचबरोबर मुंबई-पुण्यावरील रेल्वे वाहतुकीचा ताण कमी होण्यासही मदत होणार आहे. दक्षिण भारतातून उत्तरेकडे होणारी मालवाहतूकही सुलभ होणार आहे. हुबळीमार्गे येणाऱ्या रेल्वेगाड्या कऱ्हाड -लोणंद-फलटण-बारामती-दौंड मार्गे उत्तर भारताकडे जाऊ शकतात. याचबरोबरच पुणे-मुंबई रेल्वे मार्गामुळे लोणावळा व खंडाळ्याचा पर्यटनविकास झाला. त्याचप्रमाणे कऱ्हाड-चिपळूण लोहमार्गामुळे कोयनानगरचा विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कऱ्हाड रेल्वेस्थानकाला जंक्शनचा दर्जा प्राप्त होऊन येथे माल साठवण गोदाम उभे राहू शकतील. कऱ्हाड-विजापूरचा सर्व्हे करण्याचेही रेल्वे खात्याने ठरविले असून, तशी घोषणा २०१५ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात कऱ्हाड-विजापूर रेल्वेलाईनही टाकता येऊ शकेल. (प्रतिनिधी)